ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाषणादरम्यान विरोधी खासदारांनी लोकसभेतून वॉकआउट केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेत सलग तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. याबाबत सर्वच पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्ष संसदेत बोलत आहेत. याच क्रमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांचे (काँग्रेस) दुकान प्रेमाचे नाही, तर भ्रष्टाचार, खोटेपणा, तुष्टीकरण आणि अहंकाराचे आहे, असे ते म्हणाले. Jyotiraditya Shinde criticizes oppositions INDIA front in Parliament
केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, मी या संसदेत 20 वर्षे आहे, पण दोन दशकांत असे दृश्य पाहिले नाही. विरोधकांनी पंतप्रधानांबाबत वापरलेल्या शब्दांसाठी त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी. अविश्वास प्रस्तावावर शिंदे यांच्या भाषणादरम्यान विरोधी खासदारांनी लोकसभेतून वॉकआउट केले. त्यावर ते म्हणाले की, देशातील जनतेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, आता ते लोकसभेतूनही बाहेर जात आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, ‘’राहुल गांधी काल म्हणाले होते की पंतप्रधान मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत. मी सांगू इच्छितो की पंतप्रधानांनी ईशान्येला जगाशी जोडण्याचे काम केले आहे. भारताला वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये पाहण्याची विचारधारा तुमची आहे, आमची नाही. ते पुढे म्हणाले की, आज त्यांना रामाची आठवण आली, कोणी जानवं घालत आहेत तर कोणी मंदिरात जात आहेत, परंतु हा मुखवटा काम करणार नाही.’’
Jyotiraditya Shinde criticizes oppositions INDIA front in Parliament
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??