• Download App
    Justice BR Gavai न्यायमूर्ती बीआर गवई भारताचे नवे सरन्यायाधीश

    Justice BR Gavai : न्यायमूर्ती बीआर गवई भारताचे नवे सरन्यायाधीश

    Justice BR Gavai

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Justice BR Gavai न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (बीआर गवई) यांनी आज (बुधवार, १४ मे) रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश (सीजेआय) म्हणून शपथ घेतली. ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश ठरले आहेत. त्यांच्या आधी, न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश होते. २००७ मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.Justice BR Gavai

    ३० एप्रिल रोजी कायदा मंत्रालयाने न्यायमूर्ती गवई यांची भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करणारी अधिसूचना जारी केली होती. त्याआधी, १६ एप्रिल रोजी, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती गवई यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांचा कार्यकाळ फक्त सात महिन्यांचा असेल. ते २३ डिसेंबर २०२५ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतील.



    न्यायमूर्ती बीआर गवई यांचा अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग राहिला आहे. २०१६ मध्ये केंद्राने नोटाबंदीबाबत दिलेल्या निर्णयात ते सहभागी होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की सरकारला चलन बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार आहे. यासोबतच, बुलडोझर कारवाईविरुद्ध आदेश देणाऱ्या खंडपीठात न्यायमूर्ती गवई यांचाही समावेश होता. निवडणूक रोख्यांवर निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही तो भाग होता.

    यापूर्वी मंगळवार, १३ मे रोजी, सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती संजीव खन्ना वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाले. यादरम्यान न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, निवृत्तीनंतर ते कोणतेही अधिकृत पद भूषवणार नाहीत. तथापि, त्यांनी सांगितले की ते कायद्याच्या क्षेत्रात काम करत राहतील.

    गेल्या वर्षीच न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच माझ्यासारखा माणूस, जो झोपडपट्टी भागातील महानगरपालिकेच्या शाळेत शिकला होता, तो या पदावर पोहोचू शकला. एवढेच नाही तर त्यांनी ‘जय भीम’ या घोषणेसह आपले भाषण संपवले.

    Justice BR Gavai is the new Chief Justice of India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानचे नापाक कृत्य, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीयांकडून पर्यटनावर बहिष्कार

    United nations : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर संयुक्त राष्ट्राकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

    BJP Minister Vijay Shah : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप मंत्री विजय शाह यांचे वादग्रस्त वक्तव्य; संतापाची लाट