प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेत उत्तर प्रदेशात काँग्रेस कोणाबरोबरही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना तब्बल 40 % महिला उमेदवारांना महिलांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले. त्यानुसार पहिल्या यादीत 125 पैकी 50 महिला उमेदवारांना स्थान देऊन आपल्या वचनपूर्तीची सुरुवात देखील केली. याबद्दल प्रियांका गांधी यांचे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे नेते कौतुक करत आहेत. सोशल मीडिया देखील या विषयाची चर्चा जोरदार सुरू आहे. Just 7 women out of 86 names, that’s only 8% women candidates
परंतु प्रियांका गांधी यांच्या 40% महिलांना उमेदवारी हा राजकीय फॉर्म्युला फक्त उत्तर प्रदेशापुरता मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. कारण पंजाब मध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना पहिल्या यादीत 86 जणांचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फक्त 7 महिलांना संधी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. याची टक्केवारी पहिल्या यादीपुरती फक्त 8% आहे. याचाच अर्थ प्रियांका गांधींचा “लडकी हूं, लढ सकती हूं” राजकीय फार्मूला फक्त उत्तर प्रदेशापुरताच मर्यादित राहिला आहे. पंजाब मध्ये त्याची सुतराम अंमलबजावणी झालेली नाही.
शिवाय अजून उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या छोट्या राज्यांमध्ये देखील काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर व्हायची आहे. तेथे प्रियांका गांधी यांच्या फॉर्म्युला नुसार महिलांना 40% उमेदवारी देणार की काँग्रेस आपल्या पारंपरिक राजकीय पद्धतीनुसारच निवडून येण्याची क्षमता, जात-धर्म या निकषांवर आधारित उमेदवार यादी जाहीर करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Just 7 women out of 86 names, that’s only 8% women candidates
महत्त्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांपाठोपाठ एलन मस्क यांना बंगालच्या मदरसा शिक्षणमंत्र्यांचे गुंतवणुकीसाठी निमंत्रण!!
- UP Elections : हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी विधानसभेचे तिकीट नाकारले, काँग्रेसने दिली होती ऑफर
- AIMIM candidate list : एमआयएम उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ओवेसींनी यूपी निवडणुकीत उतरवले हे उमेदवार
- वर्ध्यातील आर्वी अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर नीरज कदम यांना ठोकल्या बेड्या