• Download App
    Kolkata कोलकात्यात ज्युनियर डॉक्टरांचे आंदोलन

    Kolkata : कोलकात्यात ज्युनियर डॉक्टरांचे आंदोलन आजपासून संपणार; उद्यापासून ड्युटीवर परतणार

    Kolkata

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालचे ज्युनियर डॉक्टर 10 सप्टेंबरपासून कोलकाता  ( Kolkata  ) येथील सॉल्ट लेक येथील स्वास्थ्य भवनाबाहेर सुरू असलेले आंदोलन आज संपवतील. आंदोलन संपवण्यापूर्वी ते आरोग्य भवन ते सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील.

    कनिष्ठ डॉक्टरांनी 19 सप्टेंबर रोजी उशिरा पत्रकार परिषद घेऊन शनिवार, 21 सप्टेंबरपासून कामावर रुजू होणार असल्याची माहिती दिली. आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येनंतर गेल्या 41 दिवसांपासून डॉक्टर संपावर आहेत.



    त्यांचा संप अंशत: सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते आता आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा पुरवतील. पूरग्रस्त भागात वैद्यकीय शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. तथापि, ते ओपीडी आणि कोल्ड ऑपरेटिंग थिएटरच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत.

    न्यायासाठी आमचा लढा संपलेला नाही, असे ज्युनिअर डॉक्टरांनी सांगितले. बंगाल सरकारला आम्ही एका आठवड्याची वेळ देत आहोत. या कालावधीत सरकारने सर्व आश्वासनांची अंमलबजावणी न केल्यास पुन्हा संप सुरू करू.

    डॉक्टरांच्या 3 मागण्या मान्य

    बलात्कार-हत्या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्यांना अटक करावी.
    माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर कठोर कारवाई करावी.
    कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी राजीनामा द्यावा.

    2 मागण्यांवर डॉक्टर ठाम

    आरोग्य सचिवांना पदावरून हटवण्यात यावे.
    रुग्णालयातील ‘थ्रेट कल्चर’ संपवले पाहिजे.

    आंदोलकांपैकी डॉ. आकिब यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, पश्चिम बंगालमधील पूरस्थिती आणि राज्य सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही अर्धवट कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.

    आमच्या मागणीवरून कोलकाता पोलिस आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालकांना हटवण्यात आल्याचे कनिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. मात्र, याचा अर्थ आंदोलन संपले असे नाही. राज्याचे आरोग्य सचिव एनएस निगम यांना हटवण्याची आणि रुग्णालयांमधील धमकीची संस्कृती संपवण्याची आमची मागणी अजूनही सुरू आहे.

    Junior doctors’ protest in Kolkata will end from today; Will return to duty from tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!