विशेेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोबाईलसाठी ५-जी तंत्रज्ञान वापरले तर त्यातून उत्सर्जित होणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी ही मानवी जीवनाला खूप हानीकारक ठरेल. या तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर होणार असल्याची चिंता व्यक्त करीत अभिनेत्री जुही चावला हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Juhi Chawala against 5 G technology
या तंत्रज्ञानाच्या परिणामांबाबत संशोधन करण्याची गरज देखील जुही चावलाने व्यक्त केली आहे. यासंबंधी तिने एक निवेदनही जारी केले आहे. हे तंत्रज्ञान मानवी जीवनासाठी अजिबात हानीकारक नाही, असे सिद्ध करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे. दोन जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
‘देशात ५ जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, त्याचे आरोग्यवर होणारा परिणाम आणि भावी पिढ्या यांचा विचार केला जात नाही. कुणीही व्यक्ती, प्राणी, पक्षी, किडे आणि वनस्पती रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या प्रभावापासून दूर राहू शकणार नाही. या फ्रिक्वेन्सीचा स्तर सध्यापेक्षा दहा ते शंभरपटीने अधिक असेल. त्याचा मानवी आरोग्य विपरित पीरणाम होईलच. त्याबरोबरच पृथ्वीवरील वातावरणावर संकट येईल, असा दावाही जुहीने केला आहे.
Juhi Chawala against 5 G technology
महत्त्वाच्या बातम्या
- सॅल्यूट भारतीय सैनिकांना , ११०० अंश सेल्यियसच्या लाव्हाच्या लाटांपासून कांगोतील नागरिकांना वाचविले
- CoronaVaccine : किशोरवयीन मुलांचे लसीकरण करणारा सिंगापूर ठरणार जगातील पहिला देश
- भाजपविरोधी ११ मुख्यमंत्र्यांना केरळच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र; कोविड लसीच्या नावाखाली राजकीय एकत्रीकरणाचे प्रयत्न
- सकाळची फडणवीसांची भेट; सायंकाळी संभाजी राजेंचे ट्विट; उध्दव ठाकरेंची विकेट हिट…!!