• Download App
    ...अखेर जेपी नड्डांच्या पत्नीची कार सापडली वाराणसीत, दिल्लीतून १९ मार्चला गेली होती चोरीला JP Naddas wifes car found in Varanasi stolen from Delhi on March 19

    …अखेर जेपी नड्डांच्या पत्नीची कार सापडली वाराणसीत, दिल्लीतून १९ मार्चला गेली होती चोरीला

    राजधानी दिल्लीतील गोविंदपुरी भागातून १९ मार्च रोजी ही कार चोरीला गेली होती.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची चोरी झालेली फॉर्च्युनर कार वाराणसीत सापडली आहे. राजधानी दिल्लीतील गोविंदपुरी भागातून १९ मार्च रोजी ही कार चोरीला गेली होती. त्यानंतर चालकाने कार चोरीला गेल्याची एफआयआर दाखल केली. पोलिसांनी कारचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली होती. ज्यात अखेर पोलिसांना यश मिळाले आणि कार वाराणसी येथून जप्त करण्यात आली. JP Naddas wifes car found in Varanasi stolen from Delhi on March 19

    कारची सर्व्हिसिंग करून घेतल्यानंतर ड्रायव्हर जोगिंदर गोविंदपुरी येथील त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी आला होता. यावेळी कार चोरीला गेली. त्यानंतर जोगिंदरने पोलिसांकडे कार चोरीची तक्रार केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारचा शोध सुरू केला.

    कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले आणि चोरटे गुरुग्रामच्या दिशेने कार घेऊन जात असल्याचे आढळले. नड्डा यांच्या पत्नीच्या फॉर्च्युनर कारचा क्रमांक हिमाचल प्रदेशचा आहे. कारण नड्डा हे त्या ठिकाणचे रहिवासी आहेत आणि त्यांनी या कारची नोंदणी त्यांच्या गृहराज्य हिमाचल प्रदेशमध्ये केली होती.

    कार चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळले की जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरण्यासाठी क्रेटा कारमध्ये बदमाश आले होते. चौकशीत त्याने ही गाडी मागणीनुसार चोरल्याचे सांगितले. ही कार नागालँडला पाठवली जाणार होती, मात्र या बदमाशांना पोलिसांनी वाराणसीत पकडले. या प्रकरणी पोलिसांनी बडकल येथील रहिवासी शाहिद आणि शिवांग त्रिपाठी यांना अटक केली आहे. त्यांनी कार बडकल येथे नेली आणि तिची नंबर प्लेट बदलली. त्यानंतर अलिगड, लखीमपूर खेरी, बरेली, सीतापूर, लखनऊमार्गे बनारसला पोहोचले.

    JP Naddas wifes car found in Varanasi stolen from Delhi on March 19

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला

    Delhi HC : HCचा कुलदीप सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार; उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या न्यायिक कोठडीतील मृत्यू प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा

    Thalapathy Vijay : करूर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता विजयची 8 दिवसांत दुसऱ्यांदा चौकशी, गेल्या वेळी CBI ने 7 तास प्रश्नोत्तरे केली होती