विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना दोन शिव्या दिल्या. राहुल गांधींची जीप कापा राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या, असे आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे म्हणाले. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लांबलचक पत्र लिहून देशातला राजकारणाचा पोत कसा घसरला आहे, तो सावरण्याची कशी गरज आहे, पंतप्रधानांनी आपल्या पोटातल्या नेत्यांना कशा पद्धतीने कडक समज दिली पाहिजे, वगैरे गोष्टी केल्या. भाजप आणि सत्ताधारी गोटातल्या नेत्यांचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. JP Nadda bjp target to congress
मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले. काँग्रेसी इकोसिस्टीमने देशातल्या घसरलेल्या राजकारणावर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. यानिमित्ताने राहुल गांधींच्या विविध गुणांची भलामण करण्यात अनेक नेते आणि विचारवंत गुंग झाले.
पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्र लिहून या सगळ्या गोष्टींमधली हवा काढली. राहुल गांधींना भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दोन शिव्या दिल्या, तर अस्वस्थ झालेले काँग्रेस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 10 वर्षांत ठाई ठाई कसे शिव्या मोजत होते, याची आठवण नड्डा यांनी खर्गे यांना करून दिली. पंतप्रधान मोदींना काँग्रेसच्या नेत्यांनी आणि त्यांच्या इकोसिस्टीमने 110 शिव्या मोजल्याचे नड्डा यांनी या पत्रात आवर्जून नमूद केले.
सोनिया गांधींनी मोदींना “मौत का सौदागर” म्हटले होते. राहुल गांधींनी मोदींना दांडक्याने मारण्याची भाषा केली होती. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना “नीच” म्हटले होते. इतकेच नाही तर अनेक काँग्रेस नेत्यांनी कधी “गंदी नाली का किडा”, तर कधी “मोदी तेरी कब्र खुदेगी”, “कुत्ते की मौत मरेगा” अशी टीका करून मोदींच्या मरणाची कामना केली. “चौकीदार चोर”, निकम्मा, हिंदू जिना, औरंगजेब अशी टीका करून पंतप्रधानांचा सतत अपमान केला. त्यावेळी काँग्रेसला देशातल्या राजकारणाचा स्तर घसरलेले दिसला नाही. तेव्हा राजकीय आणि सामाजिक सभ्यता धोक्यात आल्याचे काँग्रेसी इकोसिस्टीमला आढळले नाही. पण राहुल गांधींविषयी कोणी गैरउद्गार काढले, तर लगेच राजकीय आणि सामाजिक स्तर घसरल्याचा साक्षात्कार काँग्रेसी इकोसिस्टीमला झाला, अशा शब्दांमध्ये नड्डा यांनी पत्रातून मल्लिकार्जुन खर्गे यांना टोचले.
JP Nadda bjp target to congress
महत्वाच्या बातम्या
- Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मनातल्या मुख्यमंत्र्यांची जोरदार स्पर्धा; पण नाव जाहीर करण्याची कुणाचीही हिंमतच होईना!!
- Hockey : चिनी भूमीवर चीनवर मात करून भारत हॉकीत एशियन चॅम्पियन; ऑलिंपिकचे तिकीट निश्चित!!
- Adani Green Energy : अदानी ग्रीन एनर्जी महाराष्ट्र सरकारला 6600 मेगावॅट वीज पुरवेल
Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला