- …हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असंही ‘ABVP’च्या अधिवेशनात म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 69 व्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ”मी विद्यार्थी परिषदेचे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे हे मला निसंकोचपणे सांगायचे आहे. आज येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याचा मला किती अभिमान आहे हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही. हे फक्त त्या व्यक्तीलाच अनुभवता येईल, ज्याने राजकोट अधिवेशनात पंडालच्या शेवटी बसून सुरुवात केली आणि आज येथे प्रमुख पाहुणे म्हणून उभा आहे.”Journey of the Student Council has been linked to the development of the country Amit Shahs statement
शाह म्हणाले, हे अधिवेशन दोन दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम, विद्यार्थी परिषदेचे हे अधिवेशन अमृत वर्षात प्रवेश करत आहे. दुसरे म्हणजे, हे अधिवेशन म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करणारे अधिवेशन आहे.
गृहमंत्री म्हणाले की, विद्यार्थी परिषदेने अनेक प्रसंगी संघर्ष केला. ज्ञान, नम्रता आणि एकात्मतेचा मूळ मंत्र आत्मसात करून संयमाने एक मार्ग मोकळा केला आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देशासमोर, शिक्षणविश्वासमोर आणि देशाच्या सीमेसमोर आलेल्या प्रत्येक आव्हानाशी झुंज दिली. देशाच्या इतिहासात हे सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
Journey of the Student Council has been linked to the development of the country Amit Shahs statement
महत्वाच्या बातम्या
- नीरा देवघर सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारचे 3591.46 कोटी मंजूर; भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस पट्ट्याला लाभ!!
- नरसिंह रावांशी मधूर संबंधांवर प्रणवदांच्या डायरीतून “प्रकाश” आणि गांधी परिवाराची अंधारी बाजू उघड!!
- फडणवीसांचा अजितदादांना दणका; सुप्रिया सुळेंना नवाब मलिक यांचा कळवळा!!
- ओडिशा आणि झारखंडमध्ये बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर आयकर विभागाचे छापे