विशेष प्रतिनिधी
गाझियाबाद : पूरग्रस्त आणि कोविडग्रस्तांसाठी जमविलेल्या तीन कोटी रुपयांच्या मदतनिधीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी महिला पत्रकार राणा अयूब यांच्यावर गाझियाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसह कोविड रुग्ण आणि पूरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या देणगीत गैरव्यवहार करून पैैसे खाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.Journalist Rana Ayub charged with embezzling money from flood relief
राणा अयूब या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. मोदी सरकारविरुध्द सातत्याने आरोप करत असतात. कोरोनाग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी नुकत्याच तीन मोहीमा चालविल्या होत्या. यामध्ये धर्मादाय नावाखाली तीन कोटी रुपये गोळा केल्या.
मात्र,राणा अयूब यांनी २०२० पासून बिहार, आसाम आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्त, कोरोनाग्रस्त तसेच झोपडपट्टांमध्ये राहणाऱ्यांसाठी मदतनिधी गोळा करण्यास सुरूवात केली होती. त्यासाठी क्राऊड फंडीगचा मार्गही वापरला आहे. या काळात त्यांनी परदेशातूनही डॉलर्समध्ये पैैसे घेतले. यामध्ये परदेशी फॉरीन कॉँट्रीब्यूशन रेगुलेशन एक्टचा भंग करण्यात आला.
या पध्दतीने त्यांनी तीन कोटी रुपये गोळा केले. मात्र, या पैशाचा वापर लोकांसाठी केला नाही. स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. अपहारासाह राणा अयूब यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संगणक संसाधनांचा वापर करून विश्वासाचा भंग करणे आणि फसवणूक करणे.
नुकत्याच एका कथित बनावट व्हिडीओच्या प्रसारणप्रकरणीही राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका ७२ वर्षीय मुस्लिम वृध्दाला बुलंदशहर येथे चार जणांनी मारहाण करून दाढी कापल्याचा आरोप केला होता.
अपहरण केल्यानंतर त्याला जय श्री रामचा जप करण्यास भाग पाडले होते. गाझियाबाद पोलिसांनी केलेल्या तपासात नंतर हे आरोप खोटे असल्याचे आढळून आले. एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी त्याने हे आरोप केले होते.
Journalist Rana Ayub charged with embezzling money from flood relief
महत्त्वाच्या बातम्या
- राहूल गांधींनी कटरा ते वैैष्णोदेवी १४ किलोमीटर केला पायी प्रवास, राजकीय वक्तव्य करण्यास दिला नकार
- धैर्य : तालिबानशी महिलांची थेट लढाई,दीर्घ लढ्यासाठी सज्ज
- तेजस्वी यादव – चिराग पासवान यांच्या भेटीची पाटण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चा
- फ्रॉन्समध्ये महिलांना गर्भनिरोधक साधने मोफत मिळणार