• Download App
    इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान, पाकिस्तानात लोकशाही नावालाच- हमीद मीर|Journalist Hamid Mir targets Pak PM

    इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान, पाकिस्तानात लोकशाही नावालाच- हमीद मीर

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान हे आतापर्यंतचे सर्वांत असहाय्य पंतप्रधान असून पाकिस्तानात पत्रकारांसाठी भयाचे वातावरण निर्माण होत आहे, अशी टीका वरीष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी केली आहे.
    ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीतदरम्यान हमीद मीर म्हणाले पाकिस्तानमध्ये माध्यम स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. देशात लोकशाही केवळ नावालाच शिल्लक आहे,’ असे ते म्हणाले. Journalist Hamid Mir targets Pak PM

    ‘टॉक शो’मधून काढून टाकण्यास इम्रान खान हे थेटपणे जबाबदार असतील असे मला वाटत नाही. पूर्वीच्या अनेक पंतप्रधानांप्रमाणेच ते असहाय्य असून मला कोणतीही मदत करू शकत नाहीत. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे देशातील गुप्तचर संस्थांचाच हात आहे.



    थेट प्रक्षेपण सुरु असलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार टीका केल्यानंतर मीर यांना कॅमेरासमोर येण्यास नुकतीच मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पत्रकार असाद अली तूर याच्यावर इस्लामाबादमध्ये तीन जणांनी हल्ला केला होता.

    त्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हमीद मीर यांनी पाकिस्तानी सैन्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे जिओ वाहिनीवरील त्यांच्या प्रसिद्ध टॉक शोमधून त्यांना दूर करण्यात आले होते.

    Journalist Hamid Mir targets Pak PM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही

    Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय