Mizoram-Assam Dispute : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मिझोराम आणि आसामने सीमा विवादांवर चर्चा केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे मान्य केले. यासह मिझोरामला प्रवास न करण्यासंबंधी पूर्वी दिलेला सल्ला आसाम सरकार मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले. Joint Statement On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मिझोराम आणि आसामने सीमा विवादांवर चर्चा केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे मान्य केले. यासह मिझोरामला प्रवास न करण्यासंबंधी पूर्वी दिलेला सल्ला आसाम सरकार मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले.
आसाम आणि मिझोराम यांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, गृहमंत्रालय आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेवरील तणाव संपवण्यासाठी आणि चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढण्यासाठी उचललेल्या पावलांवर ते पुढे जातील. संयुक्त निवेदनात, आसाम आणि मिझोराम यांनी आंतरराज्य सीमेवरील भागात शांतता राखण्यासाठी सहमती दर्शविली आहे. दोन्ही राज्ये संघर्षाच्या ठिकाणी गस्तीसाठी पोलीस दल पाठवणार नाहीत. यासह तेथे अतिरिक्त सैन्य तैनात केले जाणार नाही.
26 जुलै रोजी रक्तरंजित संघर्ष
दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा विवादाने 26 जुलै रोजी रक्तरंजित संघर्षाचे रूप धारण केले होते. ज्यामध्ये आसामचे 6 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक ठार झाला होता, तर सुमारे 50 लोक जखमी झाले होते. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी बुधवारी ट्विटरद्वारे सांगितले की, दोन्ही राज्यांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा आहे.
त्यांनी ट्विट केले, “उद्या 5 ऑगस्ट 2021 रोजी आसाम सरकारचे प्रतिनिधी एका वरिष्ठ मंत्र्याच्या नेतृत्वाखाली मिझोराम सरकारच्या शिष्टमंडळाला भेटतील. मला खात्री आहे की, यामुळे सीमा विवाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा करार होईल.
Joint Statement On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus Spyware Case : सर्वोच्च न्यायालयाच्या लेखी पेगासस प्रकरण गंभीर, याचिकाकर्त्यांना त्यांच्या याचिकेची प्रत केंद्राला पाठवण्यास सांगितले
- पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा उच्छाद : धर्मांधांनी गणपती मंदिराची केली तोडफोड, मूर्तीही केली ध्वस्त; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन
- आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTOला चकरा मारण्याची गरज नाही, NGO आणि ऑटो कंपनीदेखील देऊ शकणार परवाने
- कलम 370 पासून मुक्तीची दोन वर्षे : फुटीरतावादाची निघाली हवा, देशद्रोह्यांचा आवळला फास, दगडफेक करणारेही झाले गायब
- यूकेने भारताला रेड लिस्टमधून काढले, 10 दिवसांचे हॉटेल क्वारंटाइन बंद, आता फक्त होम आयसोलेशन