विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दल आणि लष्कराने सियालकोट चकलाला यांच्यासह सात पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर हल्ले केले. पण पाकिस्तानने ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे दावे केले. ते भारताने फेटाळून लावले.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर मधल्या वस्तुस्थितीची माहिती दिली.
पाकिस्तानने काल रात्री जम्मू काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत 36 ठिकाणी भारतातल्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले. त्यात लॉन्ग रेंज मिसाईल्स वापरली. परंतु भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने ते सगळे हल्ले नाकाम केले. पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार करून भारतीय नागरिक मारले.
भारतीय सैन्य दलाने प्रत्युत्तर देताना पाकिस्तान मध्ये रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान इथल्या लष्करी आणि हवाई तळांवर हल्ले केले. पाकिस्तान मधला सियालकोट एअर बेस उद्ध्वस्त केला. या हल्ल्यात भारताने अत्याधुनिक शस्त्र वापरून फक्त लष्करी आणि हवाई तळांना नुकसान पोहोचवले नागरी वस्त्यांवर भारताने हल्ले केले नाहीत.
मात्र पाकिस्तानने सोशल मीडियातून खोट्या बातम्या पसरवणे सुरूच ठेवले. भारतीय हवाई दलाची स्कॉर्डन लीडर शिवानी सिंह हिला आझाद काश्मीरमध्ये ताब्यात घेतल्याचे दावे केले. भारताची ब्राह्मोस आणि S400 हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केल्याचे दावे केले हे दोन्ही नावे भारतीय सैन्य दलाने पुराव्यांसह फेटाळून लावले