Johnson and Johnson : आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनावरील सिंगल डोस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने भारताच्या औषध नियामकांकडे लसीच्या चाचणीसह आयात परवान्याचीही परवानगी मागितली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) कोविड-19 वरील तज्ज्ञ समितीची तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे. Johnson and Johnson single dose vaccine to arrive soon in india, company seeks permission for 3rd-phase trial
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनावरील सिंगल डोस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने भारताच्या औषध नियामकांकडे लसीच्या चाचणीसह आयात परवान्याचीही परवानगी मागितली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) कोविड-19 वरील तज्ज्ञ समितीची तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
खरंतर, नुकतेच केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन, जपान आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेल्या लसींना भारतात थेट मंजुरी देण्यात येणार आहे. यासाठी फास्ट ट्रॅक मंजुरीचे तंत्र अवलंबले जाईल. अमेरिकेत सध्या जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, फायझर यांच्या लसींनाच मान्यता मिळालेली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनने 12 एप्रिल रोजी ग्लोबल क्लिनिकल ट्रायल डिव्हिजनमध्ये सुगम ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केला होता. त्यांनी बायोलॉजिकल डिव्हिजनच्या माध्यमातून अर्ज केला नाही, हे डिव्हिजन लसी आणि इतर वैद्यकीय प्रकरणे हाताळते. तथापि, त्यातील काही तांत्रिक बाबींमुळे जॉन्सन अँड जॉन्सनने सोमवारी पुन्हा अर्ज केला.
जॉन्सन अँड जॉन्सनची लस तीन महिन्यांपर्यंत 2 ते 8 डिग्री सेल्सियसपर्यंत ठेवली जाऊ शकते. जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस लस आहे. भारताने आतापर्यंत परवानगी दिलेल्या तीन लसींमध्ये डबल डोस घ्यावे लागतात. भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक-व्ही यांना आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याची परवानगी देऊन लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि औद्योगिक प्रतिष्ठानांना थेट उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.
Johnson and Johnson single dose vaccine to arrive soon in india, company seeks permission for 3rd-phase trial
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणार DRDOचे नवे संशोधन, हायपॉक्सियात जाण्यापासून रुग्णांचा होईल बचाव
- Corona Updates : देशात सलग तिसर्या दिवशी २.५९ लाखांहून अधिक रुग्ण, २४ तासांत १७६१ जणांचा मृत्यू
- काय सांगता! रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजन सर्वांसाठी फुकट; दमण-दीवचे प्रशासक प्रफुल पटेल यांचा ऐतिहासिक निर्णय
- आरोग्यमंत्री आपल्या जिल्ह्यात भरभरून नेताहेत इंजेक्शन, औरंगाबादला का नाही?, खा. इम्तियाज जलील यांचा सवाल
- आमने-सामने : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा दिला सल्ला ; त्यावर चंद्रकांत पाटलांचा खोचक हल्ला ; पुन्हा रंगले ट्विटर वर वाॅर