Johnson And Johnson : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला भारतात तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, भारतात वापरली जाणारी ही पहिली लस असेल जी केवळ एका डोसमध्ये कोरोनाविरुद्ध प्रभावी ठरते. johnson and johnson single dose covid 19 vaccine is given approval for emergency use in india
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला भारतात तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, भारतात वापरली जाणारी ही पहिली लस असेल जी केवळ एका डोसमध्ये कोरोनाविरुद्ध प्रभावी ठरते.
मनसुख मंडाविया यांनी ट्विट केले की, भारताने आपल्या लसीच्या बास्केटमध्ये वाढ केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. आता भारतात 5 लसींना तातडीच्या वापराची मंजुरी मिळालेली आहे. मंडाविया म्हणाले, कोरोनाविरुद्ध आपल्या देशाच्या युद्धाला यामुळे चालना मिळेल.
कंपनीचा दावा – लस 85% प्रभावी आहे
5 ऑगस्ट रोजी जॉन्सन अँड जॉन्सनने सिंगल डोस लसीच्या वापरासाठी भारत सरकारकडे मंजुरी मागितली होती. कंपनीच्या मते, चाचणीमध्ये लस 85% प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
भारतात या लसींना मान्यता
कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्नानंतर मंजूर झालेली जॉन्सन अँड जॉन्सनची पाचवी लस आहे. तथापि, सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही लस सध्या भारतात वापरली जात आहे. सरकारी केंद्रांवर कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन दिले जात आहेत. तर स्पुतनिक खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या लसींचे दोन डोस दिले आहेत. कोव्हिशील्ड 84 दिवसांत दोन डोसमध्ये दिले जातात, तर कोव्हॅक्सिनचे डोस 4 ते 6 आठवड्यांच्या अंतराने दिले जातात.
कोणती लस किती टक्के प्रभावी
कोव्हिशील्ड 90 % प्रभावी
कोव्हॅक्सिन 81% प्रभावी
मॉडर्ना 94.1% प्रभावी
स्पुतनिक व्ही 91.6% प्रभावी
जॉन्सन अँड जॉन्सन 85% प्रभावी
johnson and johnson single dose covid 19 vaccine is given approval for emergency use in india
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Kundra Case : शर्लिन चोप्राचा खुलासा, राज कुंद्रा म्हणाला होता की, शिल्पाला माझे व्हिडिओ आवडतात !
- मद्याच्या महसुलातून दिल्ली सरकारची बंपर कमाई, 20 झोनच्या वाटपातून 5300 कोटींचे घसघशीत उत्पन्न
- Tokyo Olympics : भारतीय गोल्फरने पदक गमावले, पण मने जिंकली; पंतप्रधान मोदी म्हणाले – ‘वेल प्लेड अदिती’
- Raj kundra case : राज कुंद्राची याचिका हायकोर्टाने फेटाळली, अटक बेकायदेशीर असल्याचे दिले होते आव्हान
- ऐतिहासिक बदल : श्रीनगरच्या लाल चौकात तिरंग्याची रोषणाई, कलम 370 पासून मुक्ती मिळाल्यानंतर काश्मिरातील बदलांचे दिलासादायक चित्र