• Download App
    नोकऱ्या जाणार नाहीत तर भारतीय आयटी कंपन्यात निर्माण होणार ९६ हजार नोकऱ्या|Jobs will not go away, but 96,000 jobs will be created in Indian IT companies

    नोकऱ्या जाणार नाहीत तर भारतीय आयटी कंपन्यात निर्माण होणार ९६ हजार नोकऱ्या

    भारतामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या जात आहेत. मात्र, भारतीय आयटी कंपन्या मात्र रोजगार निर्माण करण्यात अव्वल ठरणार आहेत. देशातील पाच बड्या आयटी कंपन्यांमध्ये येत्या काळात ९६ हजार नवीन नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे सांगत आयटी उद्योगाची शिखर संस्था असलेल्या नॅसकॉमने कर्मचारी कपातीची शक्यता फेटाळून लावली आहे.Jobs will not go away, but 96,000 jobs will be created in Indian IT companies


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या जात आहेत. मात्र, भारतीय आयटी कंपन्या मात्र रोजगार निर्माण करण्यात अव्वल ठरणार आहेत. देशातील पाच बड्या आयटी कंपन्यांमध्ये येत्या काळात ९६ हजार नवीन नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे सांगत आयटी उद्योगाची शिखर संस्था असलेल्या नॅसकॉमने कर्मचारी कपातीची शक्यता फेटाळून लावली आहे.

    बॅँक ऑफ अमेरिकाने जारी केलेल्या अहवालानुसार आयटी क्षेत्रात होत असलेल्या ऑटोमेशनमुळे आयटी कंपन्या २०२२ पर्यंत यातील ३० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्याची कपात करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्या वर्षाला १०० बिलियन डॉलर्सची बचत करू इच्छितात.



    देशांतर्गत असलेल्या आयटी सेक्टमध्ये १.६ कोटी कर्मचारी काम करत आहे. यापैकी जवळपास ९० लाख कर्मचारी हे अकुशल (लो स्किल्ड) आहेत. यापैकी ३० लाख कर्मचारी २०२२ पर्यंत आपली नोकरी गमावू शकतात, असं अहवालाद्वारे सांगण्यात आले आहे. मात्र, नॅसकॉमने हा अहवाल फेटाळून लावत म्हटले आहे की, देशातील सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करणारे क्षेत्र आयटीच आहे.

    २०२१-२२ या आर्थिक वर्षात पाच बड्या आयटी कंपन्या ९६ हजार नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत. ऑटोमेशन वाढत असल्याने आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे स्वरुप बदलले आहे. आता आयटी कर्मचाऱ्याचे कामही बदलले आहे. त्यामुळे अनेक नवीन नोकऱ्या तयार होत आहेत.

    कुशल कर्मचाºयांची गरज वाढली आहे. २०२१ मध्ये आयटी क्षेत्रात १ लाख ३८ हजार नवीन नोकऱ्या तयार झाल्या. आयटी कंपन्यातील सुमारे अडीच लाख कर्मचाऱ्याना नवीन डिजीटल स्किल्स शिकविण्यात आली आहेत. त्याचबरोबर ४० हजार नवीन प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार आयटी क्षेत्र विस्तारत असून मनुष्यबळ वाढत आहे.

    बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्र ऑटोमेशनमुळे संकटात सापडले आहे असे म्हणतात. मात्र, भारतात या क्षेत्रात केवळ १४ लाख कर्मचारी काम करतात. बॅँक ऑफ अमेरिकेने म्हटल्यानुसार ९० लाख कर्मचारी या क्षेत्रात नाहीत. त्याचबरोबर ऑटोमेशन आणि रोबाटिक प्रोसेस ऑटोमेशन गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातही नवीन रोजगार तयार होत आहेत, असेही नॅसकॉमने म्हटले आहे.

    Jobs will not go away, but 96,000 jobs will be created in Indian IT companies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण