• Download App
    नोकरीची संधी : महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती? Job Opportunity : Recruitment of 75000 Posts in Maharashtra; How much space in which account

    नोकरीची संधी : महाराष्ट्रात 75000 पदांची भरती; कोणत्या खात्यात जागा किती?

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील राज्यभरातील 75000 रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत काल या 75000 पदांपैकी 2000 जणांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. महाराष्ट्रात सर्व विभागीय कार्यालयांमध्ये याचे कार्यक्रम झाले. Job Opportunity : Recruitment of 75000 Posts in Maharashtra; How much space in which account

    आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.



    कोरोना महामारीच्या काळात राज्य सरकारने नोकरभरतीवर निर्बंध आणले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे १०० टक्के नोकर भरती होणार आहे.

    कोणत्या विभागात अंदाजित किती नोकर भरती होणार ?

    • आरोग्य खाते : १० हजार ५६८
    • गृह खाते : १४ हजार ९५६
    • ग्रामविकास खाते : ११ हजार
    • कृषी खाते : २ हजार ५००
    • सार्वजनिक बांधकाम खाते : ८ हजार ३३७
    • नगरविकास खाते : १ हजार ५००
    • जलसंपदा खाते : ८ हजार २२७
    • जलसंधारण खाते : २ हजार ४२३
    • पशुसंवर्धन खाते : १ हजार ४७
    • किती जागा रिक्त ?
    • गृहविभाग : ४९ हजार ८५१
    • सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२
    • जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९
    • महसूल आणि वनविभाग : १३ हजार ५५७
    • वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२
    • सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२
    • आदिवासी विभाग : ६ हजार ९०७
    • सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१

    Job Opportunity : Recruitment of 75000 Posts in Maharashtra; How much space in which account

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!