• Download App
    नोकरीची संधी : रेल्वेत 12500 जागांसाठी भरती; बारावी उत्तीर्ण उमेदावार पात्रJob Opportunity : Recruitment for 12500 Posts in Railways; 12th passed candidates are eligible

    नोकरीची संधी : रेल्वेत 12500 जागांसाठी भरती; बारावी उत्तीर्ण उमेदावार पात्र

    प्रतिनिधी

    मुंबई : सरकारी नोकरी आणि विशेषत: रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी संधी आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदाच्या 9500 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. यासाठी १२ वी पास ते पदवीधर उमेदवार rpf.indianrailways.gov.in या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. Job Opportunity : Recruitment for 12500 Posts in Railways; 12th passed candidates are eligible

    यामध्ये लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

    अर्ज करण्यासाठी उमेदवार कॉनस्टेबल पदासाठी १२ वी पास आणि सहाय्यक उपनिरीक्षक पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.

    रेल्वे भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे असावी. या भरतीसाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

    ईस्टर्न रेल्वेतही 3000 पदांची भरती

    रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर अशी अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

    ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली असून पात्र उमेदवार 29 ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत.

    Job Opportunity : Recruitment for 12500 Posts in Railways; 12th passed candidates are eligible

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!