• Download App
    नोकरीची संधी : भारतीय पोस्ट खात्यात 98083 पदांची मेगाभरती; फक्त 10 उत्तीर्णतेची अट Job Opportunity : Mega Recruitment of 98083 Posts in Indian Post Department; Only 10 passing condition

    नोकरीची संधी : भारतीय पोस्ट खात्यात 98083 पदांची मेगाभरती; फक्त 10 उत्तीर्णतेची अट

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी आली आहे. भारतीय टपाल विभागातील एकूण 23 सर्कलमध्ये 98000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टि-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. Job Opportunity : Mega Recruitment of 98083 Posts in Indian Post Department; Only 10 passing condition

    इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल.

    एकूण पदे : 98083

    पोस्टमन : 59099

    मेलगार्ड : 1445

    मल्टि-टास्किंग (MTS) : 37539



     

    शैक्षणिक पात्रता

    टपाल खात्यात नोकरीसाठी मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. यासोबत संबंधिताला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पोस्टाच्या वेबसाइटवर पहावी.

    वयोमर्यादा

    अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

    Job Opportunity : Mega Recruitment of 98083 Posts in Indian Post Department; Only 10 passing condition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र