• Download App
    SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक Job Opportunity in SBI; Recruitment for 1438 vacancies; Last 4 days left for online application

    SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक

    प्रतिनिधी

    मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० जानेवारी २०२३ आहे.

    अटी व नियम जाणून घ्या…

    पदाचे नाव : संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी

    पदसंख्या
    संकलन सूत्रधार : ९४० पदे
    सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी : ४९८ पदे

    नोकरी ठिकाण : मुंबई

    वयोमर्यादा : ६५ वर्षे

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरू होण्याची तारीख : २२ डिसेंबर २०२२
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जानेवारी २०२३

    अधिकृत वेबसाईट : sbi.co.in

    वेतनश्रेणी

    सेवानिवृत्त बॅंक अधिकारी/कर्मचारी

    Clerical : २५ हजार रुपये

    JMGS – I : ३५ हजार रुपये

    MMGS – II & MMGS – III : ४० हजार रुपये

    निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असणार आहे.

    बॅंकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर बॅंकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.

    मुलाखतीला १०० गुण असतील, मुलाखतीतील पात्रता गुण बॅंकेद्वारे ठरवले जातील. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

    Job Opportunity in SBI; Recruitment for 1438 vacancies; Last 4 days left for online application

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य