• Download App
    भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी; 40889 पदांसाठी भरती; लवकर करा अर्ज Job Opportunity in Indian Post Department; Recruitment for 40889 posts; Apply early

    भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी; 40889 पदांसाठी भरती; लवकर करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय टपाल विभागात १० वी उत्तीर्णांना काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरात शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या एकूण ४० हजार ८८९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. Job Opportunity in Indian Post Department; Recruitment for 40889 posts; Apply early

    अटी आणि नियम

    पदाचे नाव : शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

    पदसंख्या : ४० हजार ८८९

    नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

    वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरू होण्याची तारीख : २७ जानेवारी २०२३

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ फेब्रुवारी २०२३

    अधिकृत वेबसाईट : www.indiapost.gov.in

    – महाराष्ट्रासाठी किती जागा?

    महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण २५०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण महाराष्ट्रात कुठेही आहे. याकरता अर्ज शुल्क १०० रुपये आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

    Job Opportunity in Indian Post Department; Recruitment for 40889 posts; Apply early

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!