प्रतिनिधी
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) च्या वतीने प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या एकूण 6000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. 2 ऑगस्टपासून बँकेतील या नोकऱ्यांसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. IBPS च्या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे. Job Opportunity : Bumper Recruitment in 6 Banks
IBPS कडून एकूण 6,432 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 2 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार असून 22 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
असा करा अर्ज
ibps.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर CAREER NOTICES या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर IBPS PO/MT XII Online Form 2022 for 6432 Post या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर Apply Here हा ऑप्शन सिलेक्ट करा.
- त्यानंतर आवश्यक ती माहिती देऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
- हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जाचा फॉर्म भरता येईल.
- अर्ज दाखल झाल्यावर अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्या.
- या बँकांमध्ये मिळेल नोकरी
- बँक ऑफ इंडिया : 535 जागा.
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 2 हजार 500 जागा.
- पंजाब नॅशनल बँक : 500 जागा.
- पंजाब अँड सिंध बँक : 253 जागा.
- युको बँक : 550 जागा.
- युनियन बँक ऑफ इंडिया : 2 हजार 94 जागा.
कोणाला करता येईल अर्ज??
IBPS ने सांगितल्याप्रमाणे PO च्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे कुठल्याही विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच IBPS PO पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी आहे. तसेच IBPS च्या वेबसाईटवर याबाबतची पूर्ण माहिती दिली आहे.
Job Opportunity : Bumper Recruitment in 6 Banks
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : EDने जप्त केलेल्या वस्तूंचे पुढे काय होते? कोट्यवधींचे दागिने, अब्जावधींची संपत्ती कुठे जाते? वाचा सविस्तर…
- मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू : UAE मधून केरळला परतला होता 22 वर्षीय तरुण, परदेशातही आढळला होता संसर्ग
- एकाच दिवशी 72.42 लाखांपेक्षा जास्त ITR दाखल करण्याचा नवा विक्रम ; 31 जुलैपर्यंत 5.83 कोटी विवरणपत्रे दाखल
- GST Collection : जुलैमध्ये जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये, तब्बल २८% वाढ; करचोरीही घटली