• Download App
    ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, गीतकार गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात येणार|Jnanpith Award announced Lyricist Gulzar and Jagadguru Rambhadracharya will be honoured

    ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, गीतकार गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात येणार

    2004 मध्ये पद्मभूषण आणि किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ज्ञानपीठ पुरस्कारासाठी प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. या दोघांनाही ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी जाहीर केले.Jnanpith Award announced Lyricist Gulzar and Jagadguru Rambhadracharya will be honoured

    वास्तविक, गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कामासाठी ओळखले जातात. त्यांना या काळातील सर्वोत्तम उर्दू शायरांपैकी एक मानले जाते. याआधी त्यांना 2002 मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण आणि किमान पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.



    तर चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध संस्कृत विद्वान, गुरु आणि 100 हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. गोव्यातील लेखक दामोदर मौजो यांना 2022 चा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

    ज्ञानपीठ निवड समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, “हा पुरस्कार (२०२३ साठी) दोन भाषांमधील नामवंत लेखकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांची निवड करण्यात आली आहे.”

    Jnanpith Award announced Lyricist Gulzar and Jagadguru Rambhadracharya will be honoured

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!