वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी टाकणाऱ्या जेएम जोशी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. JM Joshi, who set up a gutkha factory in Pakistan with the help of Dawood, was sentenced to 10 years
जेएम जोशीवर दाऊद इब्राहिमला मदत घेतल्याचा आरोप आहे. दाऊदच्या मदतीने त्याने २०२२ साली पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्री सुरू केली होती. या प्रकरणात जेएम जोशी दोषी सिद्ध झाला असून त्याला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जोशी बरोबर जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी या दोघांनाही या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
रसिकलाल धारीवालही दोषी
याच प्रकरणात माणिकचंद ग्रूपचे संस्थापक रसिकलाल धारीवाल देखील दोषी होते. पण २०१७ त्यांचे निधन झाल्याने त्यांना या प्रकरणातून दूर करण्यात आले. पण रसिकलाल आणि जेएम जोशी आधी एकत्रच गुटख्याचा व्यापार करत होते. पण दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले. त्यानंतर जोशीने गोवा गुटखा नावाची दुसरी कंपनी सुरू केली होती. तरीही दोघांमध्ये स्पर्धा आणि वाद सुरूच होता. या दोघांमधील वादात त्यावेळी पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमने मध्यस्थी केली होती. यातूनच पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्ररी उभी करण्यासाठी दाऊदने मदत केली होती. आता हीच मदत जेएम जोशीला महागात पडली आहे. जोशी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
जेएम जोशीने गुटखा फॅक्टरी साठी २.६४ लाखांची मशीन पाकिस्तानात पाठवल्याचाही आरोप आहे. आपल्या कंपनीतील एका तज्ञाला जबरदस्तीने पाकिस्तानात फॅक्ट्ररी सेटअप करण्याच्या मदतीसाठी पाठवले होते. फॅक्ट्ररीच्या उदघाटनासाठी स्वतः जेएम जोशी पाकिस्तानात गेला होता.
धक्कादायक बाब म्हणजे इतर दोन आरोपी जमीरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी हे १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट कटात सामील होते. आता जेएम जोशी याने वकिलांमार्फत कोर्टात युक्तीवाद करताना कंपनीने भारतात दिलेला रोजगार आणि सरकारला झालेल्या आर्थिक फायद्याची माहिती दिली. पण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कोर्टाने १० वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
JM Joshi, who set up a gutkha factory in Pakistan with the help of Dawood, was sentenced to 10 years
महत्वाच्या बातम्या