प्रतिनिधी
पणजी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुलीचे लग्न मुंबईत 7 डिसेंबरला अगदी साधेपणाने साजरे केले. कोरोनाच्या संकटात एक चांगला आदर्श घालून दिला म्हणून आव्हाड कुटुंबियांचे सर्वत्र कौतुकही झाले. मात्र, आता आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते व्हिडीओ पाहिल्यानंतर आव्हाड यांनी खरेच मुलीचे लग्न साधेपणाने लावले की, केवळ “साधेपणाने” देखावा केला, अशी प्रकारची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. Jitendra Awhad Daughter’s Grand wedding Reception
काल गोव्यातील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मंत्री, बडे कलाकार आणि परदेशातील पाहुणे उपस्थित होते. तर आज होणाऱ्या रिसेप्शनसाठी बडी मंडळी उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये अनेक नेते मंडळींच्या मुला-मुलींचे विवाहसोहळे थाटामाटत पार पडलेय. पण जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एका मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने झाल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी होत होत्या. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह अत्यंत साध्या रजिस्टर पद्धतीने संपन्न झाला होता. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. एकिकडे करोडो रुपये खर्च करुन आपल्या मुला-मुलींचे विवाहसोहळे आणि दुसरीकडे आव्हाड यांनी एकुलत्या एका मुलीचा विवाहसोहळा साध्या पद्धतीने केल्याने अनेक बड्या नेत्यांशी तुलना करण्यात आली होती. पण गोव्यातील ग्रँड रिसेप्शनचा व्हिडीओ समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. एबीपी चँनेलने हे वृत्त दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, 25 वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार, ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी बाप काय बोलणार? कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचीच इच्छा होती, म्हणूनच लग्न साधेच केले.
पण सध्या सोशल मीडियावर आव्हाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यापूर्वीच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर, खरेच आव्हाड यांनी मुलीचे लग्न साधेपणाने लावले की, केवळ देखावा केला, अशा चर्चा सुरु आहेत.
Jitendra Awhad Daughter’s Grand wedding Reception
महत्त्वाच्या बातम्या
- राऊत – सुप्रियांच्या नाचानंतर प्रफुल्ल पटेलही मुलगा प्रजयच्या लग्नात “जुम्मे की रात”वर सलमान-शिल्पा शेट्टीसोबत नाचले…!!
- केरळात १२ तासांत दोन राजकीय हत्या, राज्यात दहशतीचे वातावरण, अलप्पुझामध्ये कलम १४४ लागू
- Prashant Kishor : प्रशांत किशोर म्हणाले – नुसते पक्ष एकत्र करून काँग्रेस भाजपला हरवू शकणार नाही
- पंतप्रधान मोदी आज ‘गोवा मुक्ती दिन’ सोहळ्यात सहभागी होणार, 650 कोटींच्या प्रकल्पाची देणार भेट
- अमित शहांचा पुणे दौरा ; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन