गुजरातच्या गेल्या वेळीच्या निवडणुकांतही कॉँग्रेसपासून योग्य अंतर ठेवलेल्या जिग्नेश मेवानी यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित राहूनही अधिकृत प्रवेश केला नाही. आमदारकी जाण्याची भीती की कॉँग्रेससोबत गेल्यावर दलीत मते विरोधात जाण्याची शंका याबाबत चर्चा सुरू झाली आहे.Jignesh Mewani did not make official entry for fear of going against Dalits if he flirts with Congress.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: गुजरातच्या गेल्या वेळीच्या निवडणुकांतही कॉँग्रेसपासून योग्य अंतर ठेवलेल्या जिग्नेश मेवानी यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित राहूनही अधिकृत प्रवेश केला नाही. आमदारकी जाण्याची भीती की कॉँग्रेससोबत गेल्यावर दलीत मते विरोधात जाण्याची शंका याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
गुजरातचे अपक्ष आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी मंगळवारी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजर झाले. त्यांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली. पण मेवाणी यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही.काही तांत्रिक कारणांमुळे औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकत नाही. मी एक अपक्ष आमदार आहे आणि कोणत्याही पक्षात प्रवेश केला तर आमदार राहू शकत नाही, असं मेवाणी यांनी स्पष्ट केलं.
मेवाणी म्हणाले, मी वैचारिकदृष्ट्या काँग्रेसचा एक भाग आहे आणि गुजरातची आगामी निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढणार आहे. जी कहाणी गुजरातपासून सुरू झाली, त्या कहाणीने देशभरात खळबळ उडवून दिली. या विचाराशी जुळलं पाहिजे, असं मला मनापासून वाटतंय. पण मी अपक्ष आमदार असल्याने तांत्रिकदृष्ट्या सध्या पक्षात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र लढू.
मेवाणी यांनी गेल्या चार वर्षांत दलीत नेता म्हणून संपूर्ण देशात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी कॉँग्रेसच्या विरोधातही त्यांनी भूमिका घेतली होती. मात्र, कॉँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून मेवाणी यांना सहकार्य झाले नाही. त्याचबरोबर उत्तर भारताच्या आणि पश्चिम भारतातील अनेक भागांत कॉँग्रेसकडून दलीतविरोधी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे. राजस्थानमध्ये तर कॉँग्रेसचे सरकार असतानाही दलीतांवर अत्याचाराची अनेक प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे मेवाणी यांना कॉँग्रेसच्या या दलीतविरोधी भूमिकेचे जोखड आपल्यावर नको आहे.
Jignesh Mewani did not make official entry for fear of going against Dalits if he flirts with Congress.
महत्त्वाच्या बातम्या
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
- पंतप्रधान मोदी आज नवीन पिकांच्या ३५ जाती सादर करतील, शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतील
- INDIAN JOURNAL OF MEDICAL : शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
- Happy Birthday Lata Didi : मेरी आवाज ही पहचान है ! लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट ; 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं