• Download App
    Jharkhand  Maharashtra झारखंड - महाराष्ट्रात काँग्रेसचा महिलांमध्ये भेदभाव; एकीकडे देणार ₹ 2500, दुसरीकडे ₹ 3000!!

    Jharkhand  Maharashtra झारखंड – महाराष्ट्रात काँग्रेसचा महिलांमध्ये भेदभाव; एकीकडे देणार ₹ 2500, दुसरीकडे ₹ 3000!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : झारखंड आणि महाराष्ट्रात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होत आहेत. तिथे सर्व पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आश्वासने दिली आहेत. परंतु ही आश्वासने देताना काँग्रेसने मात्र महिलांमध्ये भेदभाव केल्याचे दिसत आहे. Jharkhand – Congress discrimination against women in Maharashtra

    महाराष्ट्रात काँग्रेसच्या 5 गॅरेंटी जाहीर करताना राहुल गांधींनी महाराष्ट्रातल्या महिलांना खटाखट 3000 रुपये देऊ केले आहेत, तर तीच रक्कम त्यांनी झारखंडच्या महिलांना फक्त 2500 ₹ देऊ केली आहे. एकाच वेळी विधानसभा निवडणुका होत असलेल्या दोन राज्यांमध्ये काँग्रेसने भेदभाव केला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने 5 गॅरेंटी जाहीर केल्यात, तर झारखंडमध्ये 7 गॅरंटी जाहीर केल्या. दोन्ही ठिकाणी खैरातीच वाटण्याचे आश्वासन दिले, पण ते आश्वासन देतानाही त्यात भेदभाव केला.


    Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला


    बाकी राहुल गांधींनी झारखंड आणि महाराष्ट्रातल्या प्रचार सभांमधल्या आपल्या भाषणांमध्ये “समानता” राखली. लोकसभा निवडणुकीत राबविला, तोच जातीभेदाचा अजेंडा विधानसभा निवडणुकीत राबवताना जातनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले. राज्यघटनेचे लाल पुस्तक दाखवून मोदी सरकार राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली. काँग्रेस आणि संघ विचारसरणी यात संघर्ष असल्याचे सांगितले. बाकीच्या भाषणांमध्ये त्यांनी फारशी व्हरायटी आणली नाही.

    Jharkhand – Congress discrimination against women in   Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’