• Download App
    लालूप्रसादांना झारखंड हायकोर्टाचा जामीन मंजूर; गरीबांना आपला मसिहा बाहेर आल्यासारखे वाटेल; तेजस्वी यादवांचे इमोशनल विधान | jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in Fodder scam case related to fraudulent withdrawal from Dumka Treasury

    लालूप्रसादांना झारखंड हायकोर्टाचा जामीन मंजूर; गरीबांना आपला मसिहा बाहेर आल्यासारखे वाटेल; तेजस्वी यादवांचे इमोशनल विधान

    वृत्तसंस्था

    पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेची आशा निर्माण झाली आहे. यावरून त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादवांनी इमोशनल विधान केले आहे. गरीबांना आपला मसिहा बाहेर आल्यासारखे वाटेल, असे वक्तव्य तेजस्वी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केले. jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in Fodder scam case related to fraudulent withdrawal from Dumka Treasury

    दुमका ट्रेझरीत अफरातफर करून रक्कम काढल्याच्या प्रकरणात लालू प्रसादांना हा जामीन मंजूर केला आहे. लालू प्रसादांनी आत्तापर्यंत निम्मी शिक्षा भोगून पूर्ण केली आहे. त्यांची तब्येत सध्या खराब आहे. त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आले आहे. या आधी त्यांना रांचीतील सरकारी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. लालू प्रसाद बाहेर येतील. गरीबांना त्यांचा मसिहा बाहेर आल्यासारखे वाटेल. पण आम्हाला त्यांच्या तब्येतीची मोठी काळजी आहे, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

    हायकोर्टाची ऑर्डर हातात येताच कायदेशीर प्रक्रिया करून लालू प्रसादांची कदाचित एम्समधूनच परस्पर सुटका करण्यात येईल. कारण सध्या ते तिथे भरती आहेत. एम्स तुरूंग प्रशासनाला नियमितपणे लालू प्रसादांच्या तब्येतीचे अपडेट पाठवत असते. ते तुरूंगात नाहीत, अशी माहिती झारखंडचे तुरूंग महानिरीक्षक वीरेंद्र भूषण यांनी पत्रकारांना दिली.

    jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in Fodder scam case related to fraudulent withdrawal from Dumka Treasury

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य