वृत्तसंस्था
रांची : Jharkhand election झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेलामधून उमेदवारी देण्यात आली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये चंपाई यांनी पक्ष सोडला.Jharkhand election
याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि अर्जुन मुंडा यांच्या पत्नींनाही तिकीट देण्यात आले आहे. मधू कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांना जगन्नाथपूरमधून, अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा यांना पोटकामधून तिकीट देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना धनवरमधून तर सीएम हेमंत सोरेन यांच्या मेहुणी सीता सोरेन यांना जामतारा येथून तिकीट देण्यात आले आहे.
पहिल्या यादीत 12 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांना जगन्नाथपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. जामतारा येथून शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जेएमएम सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या लोबिन हेमब्रम यांना बोरीओमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आपल्या पारंपारिक मतदारसंघ सरायकेला येथून चंपाई सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेन यांना घाटशिला येथून तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने जमशेदपूर पूर्व येथून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांची सून पूर्णिमा दास यांना उमेदवारी दिली आहे. अर्जुन मुंडा यांची पत्नी मीरा मुंडा पोटकामधून निवडणूक लढवणार आहे.
NDA मध्ये जागावाटप, AJSU ला 10 जागा मिळाल्या
झारखंडमध्ये एनडीएमध्ये, भाजप 68 जागांवर, AJSU-10, JDU-2 आणि LJP रामविलास 1 जागेवर लढणार आहे. नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूला जमशेदपूर पश्चिम आणि तामर जागा देण्यात आल्या आहेत. चिराग पासवान यांच्या एलजेपीला (रामविलास) चतरा जागा मिळाली आहे.
13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान
झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील.
दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Jharkhand election, 66 names in BJP’s first list
महत्वाच्या बातम्या
- Samajwadi Party काँग्रेस आणि ‘सपा’मधील संबंधात दुरावा; काँग्रेस उत्तर प्रदेशात पोटनिवडणूक लढवणार नाही
- Narendra Modi लोकांच्या अन् देशाच्या विकासासाठी जनतेचा पैसा खर्च करणे हे आमचे प्राधान्य – मोदी
- Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, डॉक्टरांसह ६ जण ठार
- Jawan Amar Pawar : छत्तीसगड येथील नक्षलवादी चकमकीत साताऱ्यातील जवान अमर पवार शहीद