• Download App
    झारखंडचे सीपीएम नेते सुभाष मुंडा यांची हत्या, कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या! Jharkhand CPM leader Subhash Munda was killed shot inside the office

    झारखंडचे सीपीएम नेते सुभाष मुंडा यांची हत्या, कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या!

    भाजपने झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर केली टीका

    विशेष प्रतिनिधी

    रांची : झारखंडची राजधानी रांची येथील दलादली भागात सीपीआय (एम) नेते सुभाष मुंडा यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सुभाष मुंडा हे त्यांच्या कार्यालयात असताना काही दुचाकीस्वारांनी येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. Jharkhand CPM leader Subhash Munda was killed shot inside the office

    या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे रांचीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक नौशाद आलम यांनी सांगितले आहे. तर या घटनेबाबत झारखंड भाजपाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे.

    बाबूलाल मरांडी यांनी ट्विट केले की, एकीकडे राजकुमार पोलीस अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याचा इशारा देत आहे. दुसरीकडे, रांचीमधील सर्वात गजबजलेल्या दलादली चौकात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या सुभाष मुंडा यांची गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली.

    बाबुलाल मरांडी यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, “राजधानी आणि संपूर्ण झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे हे वास्तव आहे. लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांच्या जागी फायरब्रँड अधिकारी येत नाहीत तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थे सुधारणार नाही.”

    Jharkhand CPM leader Subhash Munda was killed shot inside the office

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार