• Download App
    झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे उद्योग, ३०० वर बनावट कंपन्यांत गुंतवली अवैध रक्कम|Jharkhand Chief Minister's relatives illegal investment in over 300 fake companies

    झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे उद्योग, ३०० वर बनावट कंपन्यांत गुंतवली अवैध रक्कम

    विशेष प्रतिनिधी

    रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांचा आमदार भाऊ बसंत सोरेन व नातेवाईकांचे अनेक उद्योग समोर आले आहेत. त्यांनी ३०० च्या वर जास्त कंपन्या स्थापन करून त्यामध्ये अवैध कमाई गुंतवल्याचा आरोप आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सोरेन यांना दणका दिला असून रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला झारखंड उच्च न्यायालयाने प्रतिवादी बनवून चौकशीचे आदेश दिले आहेत.Jharkhand Chief Minister’s relatives illegal investment in over 300 fake companies

    मुख्य न्यायाधीश डॉ. रवी रंजन व सुजित नारायण प्रसाद यांच्या खंडपीठाने शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी केली. न्यायालयात सक्तवसुली संचालनालयालाही (ईडी) याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. शिवशंकर शर्मा यांनी झारखंड उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नातेवाईकांच्या नावावर काही कंपन्या स्थापन करून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचा आरोप केला आहे.



    त्यांनी हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याखालीही कारवाईची मागणी केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, सरकारच्या जवळचे अमित अग्रवाल आणि रवी केजरीवाल यांचे सगेसोयरे अशाप्रकारची कंपनी चालवतात. त्यात झारखंडमध्ये कमावलेले पैसे गुंतवून हॉटेल, मॉलसह इतर संपत्ती खरेदी केली.

    शिव शंकर शर्मा यांनी केवळ नावालाच असलेल्या पण गुंतवणूक केली गेलेल्या अशा २८ कंपन्यांची नावे न्यायालयाला दिली आहेत. पूरक शपथपत्र दाखल करून जवळपास २००पेक्षा जास्त कंपन्यांची यादी देत म्हटले की, या कंपन्यांतही याच लोकांनी पैसा गुंतवला आहे.

    Jharkhand Chief Minister’s relatives illegal investment in over 300 fake companies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के