वृत्तसंस्था
नवी दिल्ली : झारखंडमध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचे सांगण्यात येत असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. अवैध खनिज उत्खनन प्रकरणात सोरेन यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तसा अहवाल राज्यपालांना सादर केला आहे. Jharkhand Chief Minister Hemant Soren’s MLA is in danger
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत स्वतःच्या भावाच्या कंपन्यांना खाणी लीजवर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. खनिज मंत्रालयाची जबाबदारीही सोरेन यांनी आपल्याकडे ठेवली होती. त्यामुळेच याबाबत ईडीने कारवाई करत सोरेन यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापेमारी केली होती. यामध्ये हेमंत सोरेन हे दोषी असल्याचे आढळून आले आहेत.
निवडणूक आयोगाची राज्यपालांना शिफारस
हेमंत सोरेन यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या असून सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आयोगाने या संदर्भातील अहवाल झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राज्यपाल सध्या आपल्या खासगी दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते दौऱ्यावरून रांची मध्ये परत आल्यानंतर ते हेमंत सोरेन यांचे सदस्यत्व रद्द करण्याची घोषणा करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार देखील कोसळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे सरकार अस्तित्वात आहे. काँग्रेसचा या सरकारला पाठिंबा आहे. परंतु हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर राज्यामध्ये मोठा पेचप्रसंग उभा राहणार आहे. त्यावर हेमंत सोरेन नेमकी कोणती राजकीय चाल खेळून मात करतात?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jharkhand Chief Minister Hemant Soren’s MLA is in danger
महत्वाच्या बातम्या
- अडीच वर्षांनंतर सुप्रीम कोर्टात बसणार घटनापीठ ; 25 खटल्यांची सुनावणी
- आशिष कुलकर्णी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयात “भाजपचा माणूस”!!
- लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले ; पाकिस्तानी कर्नलने भारतीय चौकी उडवण्यासाठी 11 हजार रुपये दिले
- बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस