• Download App
    'हेमंत सोरेन यांना शोधा अन् बक्षीस मिळवा' ; झारखंड भाजप अध्यक्षांकडून घोषणा Jharkhand BJP President announces bounty for researchers to Chief Minister Hemant Soren

    ‘हेमंत सोरेन यांना शोधा अन् बक्षीस मिळवा’ ; झारखंड भाजप अध्यक्षांकडून घोषणा

    मनी लाँड्रिंगमध्ये अडकलेल्या हेमंत सोरेनवर भाजपचा हल्लाबोल!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेत आहे. मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री कुठे गेले हे अद्याप कळू शकलेले नाही. अटकेच्या भीतीने ते फरार असल्याचा आरोप भाजप करत असून त्यांना फरार ठरवत आहे. Jharkhand BJP President announces bounty for researchers to Chief Minister Hemant Soren

    झारखंड भाजप अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांचा शोध घेणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. काल ईडीची टीम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती, पण तिथे ते सापडली नाही. तपास यंत्रणेने त्याची कार आणि काही कागदपत्रे जप्त केली.

    बाबुलाल मरांडी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सुरक्षेलाच धोका नाही तर झारखंडच्या साडेतीन कोटी जनतेची सुरक्षा, सन्मान आणि प्रतिष्ठाही धोक्यात आली आहे. जो कोणी विलंब न लावता आपला “आश्वासक” मुख्यमंत्री शोधून त्यांना सुखरूप परत आणेल, त्याला माझ्याकडून अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

    Jharkhand BJP President announces bounty for researchers to Chief Minister Hemant Soren

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक