• Download App
    JEE Main Result 2021: JEE Main Result Announced! 18 No. 1; Maharashtra's only Atharva Abhijeet in copper top; check results here

    JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर!18 जण नंबर 1; महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये;इथे चेक करा निकाल-

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आला. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. JEE Main Result 2021: JEE Main Result Announced! 18 No. 1; Maharashtra’s only Atharva Abhijeet in copper top; check results here

    विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

    जेईई मेन 2021 सेशन 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबरला संपल्या होत्या. फायनल अन्सर की वर आक्षेप घेण्यासाठी 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फायनल अन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासूनच जेईई मेन्सचा निकाल jeemain.nta.ac.in वर अपेक्षीत होता. गेल्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.

    JEE Main Result 2021 चेक कसा कराल?

    स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा

    स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

    स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा

    स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.

    कोणत्या साईटवर निकाल चेक करु शकता?

    nta.ac.in

    ntaresults.nic.in

    jeemain.nta.nic.in

    JEE Main Result 2021: JEE Main Result Announced! 18 No. 1; Maharashtra’s only Atharva Abhijeet in copper top; check results here

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!