I.N.D.I.A आघाडीवरही केली आहे जोरदार टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत?
विशेष प्रतिनिधी
मधुबनी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधील मधुबनीमध्ये जेडीयू आणि आरजेडीच्या युतीवर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह म्हणाले की, जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे, ते कधीच एकत्र राहणार नाहीत. JDU RJD alliance is like oil and water Amit Shahs statement
याचबरोबर अमित शाह म्हणाले की, मी नितीश बाबूंना सांगू इच्छितो की, कितीही स्वार्थ वाढला तरी पाणी आणि तेल कधीच मिसळत नाही. तेलाला गमावण्यासारखे काहीही नाही. ते तर पाण्यालाच फक्त बदनाम करते. तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी केलेली युती तुम्हालाच बुडवेल, ही युती स्वार्थी आहे.
याशिवाय, लालू यादव यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. नितीशकुमार यांना पंतप्रधान व्हायचे आहे. पण पंतप्रधानपद रिक्त नसल्याने हे शक्य होत नाही. नरेंद्र मोदी पुन्हा तेच पद भूषवणार आहेत. ही आघाडी बिहारला पुन्हा जंगलराजकडे घेऊन जात आहे. तुष्टीकरणाच्या माध्यमातून ते बिहार अशा घटकांच्या हाती देत आहेत जे बिहार सुरक्षित राहू देणार नाहीत.
बिहारमधील मधुबनी येथे जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, त्यांनी नव्या नावाने आघाडी केली आहे. त्यांनी यूपीएच्या नावावर काम करून 12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. रेल्वेमंत्री असताना लालू यादव यांनी करोडोंचा भ्रष्टाचार केला. त्यांनी त्यांचे नाव बदलले कारण ते यूपीए नावाने परत सत्तेवर येऊ शकत नव्हते, म्हणून त्यांना I.N.D.I.A अलायन्स सोबत यावे लागले. या आघाडीचे लोक रामचरितमानसाचा अनादर करतात… रक्षाबंधन आणि जन्माष्टमीच्या सुट्ट्या रद्द करतात, ते सनातन धर्माला अनेक रोगांशी जोडतात आणि ते फक्त तुष्टीकरणच करू शकतात.
JDU RJD alliance is like oil and water Amit Shahs statement
महत्वाच्या बातम्या
- वाराणसीमध्ये रामदेव बाबांची सनातनद्वेष्ट्यांवर जोरदार टीका; २०२४चा उल्लेख करत म्हणाले…
- मराठवाड्याचे शोषण थांबवून तहान भागविणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला संजीवनी!!
- अँकर्स वरच्या बहिष्काराची भाषा काँग्रेसने बदलली, सविनय आंदोलनाची केली; पण प्रत्यक्षात बंदीची “मात्रा” चालवलीच!!
- UAE ने PoKला भारताचा भाग म्हणून दाखवले; भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा नकाशा जारी; 370 हा भारताचा मुद्दा असल्याचे सांगितले