वृत्तसंस्था
पाटणा : बिहारच्या कटिहार जिल्ह्यात जनता दल (युनायटेड)चे ज्येष्ठ नेते कैलाश महतो यांची गुरुवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटिहारमधील बरारी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली असून, महतोंवर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्या. दोन गुन्हेगार अचानक बाइकवरून कृषी फार्म चौकाजवळ पोहोचले आणि त्यांनी जेडीयू नेत्यावर गोळीबार केला.JDU leader Kailash Mahato shot dead in Bihar’s Katihar, police investigation underway
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कटिहारचे एसडीपीओ ओम प्रकाश म्हणाले, “आम्ही तपास सुरू केला असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल. सुमारे 4-5 राऊंड गोळीबार करण्यात आला. शवविच्छेदनानंतरच अधिक माहिती देता येईल.”
जेडीयू नेते कैलाश महतो यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना यापैकी दोन ते तीन गोळ्या वर्मी लागल्या. एक गोळी मानेच्या मध्यभागी लागली. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोर हवेत गोळीबार करत पळून गेले. येथे स्थानिक लोकांनी तत्काळ कैलाश महतो यांना सामुदायिक आरोग्य केंद्र बुरारी येथे नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच बुरारी पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष कुमार रजक पोलिस ताफ्यासह रुग्णालयात पोहोचले. घटनास्थळी एसडीपीओ ओम प्रकाश, कोडाचे निरीक्षक अनमोल कुमार यादव घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ब्लॉक परिसरातून शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये जमले होते.
JDU ब्लॉक अध्यक्ष मनोज सिंह कुशवाह, मुख्य प्रतिनिधी मोहम्मद इलियास, जिल्हा परिषद सदस्य गुणसागर पासवान, मुख्य प्रतिनिधी मस्कूर आलम इत्यादींनी सांगितले की, अलीकडेच पोलिस अधीक्षकांसह उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी एक अर्ज देण्यात आला होता.
JDU leader Kailash Mahato shot dead in Bihar’s Katihar, police investigation underway
महत्वाच्या बातम्या
- गव्हाच्या बंपर खरेदीमुळे सरकारची चिंता मिटली; आतापर्यंत १९५ लाख टन खरेदी, गेल्या वर्षीचा विक्रम मोडला!
- पीएम मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर खरगेंची सारवासारव, म्हणाले- कोणी दुखावले असल्यास खेद व्यक्त करेन
- Delhi excise case : मनीष सिसोदियांना न्यायालयाकडून मोठा झटका! न्यायालयीन कोठडीत केली वाढ
- आणखी एक राजकीय भूकंपाची चाहुल, ठाकरे गटाचे सर्व 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात- उदय सामंत