षडयंत्राद्वारे ममता बॅनर्जींना मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून जाहीर करायला लावलं.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जनता दल (युनायटेड) ने रविवारी नितीश कुमार यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याबद्दल काँग्रेसला जबाबदार धरले. काँग्रेसला विरोधी आघाडीचे नेतृत्व हिसकावून घ्यायचे आहे, असे जेडीयूने म्हटले आहे. JDU held Congress responsible for Nitish Kumars exit from the INDIA Alliance
जेडी(यू) नेते केसी त्यागी यांनी असा दावा केला की, ममता बॅनर्जी यांना ‘षड्यंत्राद्वारे’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यास भाग पाडले गेले. जेडीयू नेते केसी त्यागी म्हणाले, “काँग्रेसला इंडिया आघाडीचे नेतृत्व हिसकावून घ्यायचे होते. १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीचे नेतृत्व मिळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते.
तसेच, जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता की इंडिया आघाडी कोणत्याही पंतप्रधानाच्या चेहऱ्याशिवाय काम करेल.”
ते म्हणाले की,केसी त्यागी म्हणाले, “एका षड्यंत्राखाली ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान चेहरा म्हणून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यास भाग पाडण्यात आले… इतर सर्व पक्षांनी काँग्रेसविरोधात लढून आपला ठसा उमटवला आहे… काँग्रेसने जागावाटप खेचून आणले असते. पण आम्ही म्हणत राहिलो की तिथे जागा वाटून घेण्याची गरज आहे.” ते म्हणाले की, महाआघाडीकडे भाजपविरोधात लढण्याची योजना नाही.
ममता बॅनर्जी यांनीच मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मांडला होता. नितीशकुमार यांनी संयोजकपद नाकारल्याने खर्गे यांची नंतर विरोधी गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नितीश कुमार यांनी आघाडीचा चेहरा बनण्याची इच्छा असल्याचे नाकारले होते आणि नेतृत्वाच्या प्रश्नावर नंतर चर्चा केली जाईल असे सांगितले होते. शुक्रवारी जेडीयूच्या एका आमदाराने असा दावा केला होता की महाआघाडीमध्ये नितीश कुमार यांचा अपमान केला जात आहे आणि ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.
JDU held Congress responsible for Nitish Kumars exit from the INDIA Alliance
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराचे भाजप खासदाराला विजयी करण्याचे आवाहन; शिवमोग्गामध्ये चांगले काम झाल्याची दिली पावती
- मराठा आरक्षणावर शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयाशी नारायण राणे असहमत; उद्या पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका!!
- नितीश कुमार हे रंग बदलणारा सरडा; काँग्रेस – राष्ट्रवादीची शिव्यांची लाखोली!!
- बिहारमध्ये भाजपमध्ये देखील खांदेपालट; सम्राट चौधरी, विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी!!