• Download App
    Jayaram Ramesh ट्रम्प आठ वेळा बोलले, मोदींनी कोलले; पण ट्रम्पचे भारतीय प्रवक्ते अजून का उड्या मारताहेत??

    ट्रम्प आठ वेळा बोलले, मोदींनी कोलले; पण ट्रम्पचे भारतीय प्रवक्ते अजून का उड्या मारताहेत??

    नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवून आणले, असे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी आठ नाही, अकरा वेळा बोलले तरी त्यांच्याकडे बिलकूल लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलले. पण हे लक्षात न घेता ट्रम्प यांचे भारतीय प्रवक्ते मात्र अजूनही उड्या मारत सुटलेत. Jayaram Ramesh

    काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश वारंवार मोदी सरकारला ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून घेरले. तसे त्यांनी आजही घेरले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सौदी अरेबिया आणि कतारमध्ये अकरा दिवसांमध्ये आठ वेळा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ceasefire संदर्भात वक्तव्य केले. अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये ceasefire केले. अन्यथा युद्ध फार मोठे भडकले असते, असे ट्रम्प म्हणाले, पण पंतप्रधान मोदींनी अजूनही त्यावर तोंड उघडले नाही. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तान पेक्षा दहापटींनी वाढली, पण ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच बोटीत कोंबले, तरी देखील मोदी काही नाही बोलले, अशी जुनीच जयराम रमेश यांनी केली. Jayaram Ramesh

    वास्तविक डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा बोलले किंवा आठव्यांदा बोलले हा विषयच नाही. मोदींनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला जाहीर किंवा छुपा पाठिंबा दिला नाही, हा खरा मुद्दा आहे. उलट पाकिस्तान मधूनच ceasefire साठी फोन आले. भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आणि तरीही ते आम्ही थांबवले नाही. फक्त सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवली, असे मोदींनी वारंवार जाहीरपणे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकन प्रशासन यांचे नावही त्यांनी घेतले नाही. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील ठामपणे पाकिस्तानातून ceasefire
    साठी फोन आला, हे वारंवार अधोरेखित केले. भारताच्या सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळे 33 देशांमध्ये जाऊन भारताची वरचढ बाजू वारंवार मांडत आहेत. यात अमेरिका या देशाचाही समावेश आहे. तिथे तर काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर हे भारताची बाजू मांडून आले. तिथे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देखील घेतले नाही. यातून मोदी सरकारची खमकी भूमिका दिसून आली. पण जयराम रमेश यांच्या सारख्या अतिउच्चशिक्षित “ट्रम्प समर्थकाला” ती दिसली नाही.



    – अमेरिकेच्या अध्यक्षापुढे डोलायचा शिरस्ता मोडला

    वास्तविक आत्तापर्यंत अमेरिकेच्या अध्यक्षांनी कुठेही आणि काहीही बोलायचे आणि जगाने डोलायचे असा शिरस्ता होता. तो मोदी, जयशंकर आणि 7 शिष्टमंडळांमधल्या सर्वपक्षीय 52 खासदारांनी मोडून काढला. डोनाल्ड ट्रम्प आठ वेळा बोलले, तरी त्यांच्याकडे भारतातल्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी लक्षही दिले नाही. भारताची ठाम बाजू ढिल्ली पडू दिली नाही. पण जयराम रमेश यांनी मात्र काँग्रेसचे प्रवक्ते पद सोडून ट्रम्प यांचे प्रवक्ते पद बिनपगारी स्वीकारले आणि म्हणून त्यांनी वारंवार मोदी सरकारला टोचले. त्या पलीकडे जयराम रमेश यांच्या वक्तव्यातून कुठलेच दुसरे सत्य समोर आले नाही

    Jayaram Ramesh siding with Donald Trump and then targeting Modi government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gurugram : गुरुग्राममध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडूची हत्या; अकादमी चालवल्याच्या रागातून वडिलांनी झाडल्या गोळ्या

    जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांच्या अनुकूल प्रतिक्रिया; मग खोडसाळपणा केला कुणी??

    Bhagwant Mann : भगवंत मान यांची पीएम मोदींच्या परदेश दौऱ्यावरून टीका, परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आक्षेप