विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी खासदार व चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत चौधरी यांची मंगळवारी नियुक्ती झाली. त्यांचे पिता अजित सिंह यांचे सहा मे रोजी कोरोनामुळे निधन झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. अशाप्रकारे पक्षाच्या अध्यक्षपदी आता तिसऱ्या पिढीतील नेतृत्व आले आहे. Jayant singh will became president of RLD
चौधरी केवळ ४२ वर्षांचे आहेत. याआधी ते उपाध्यक्ष होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून संपादन केली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्स येथून फायनान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्हर्चुअल बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला.
पक्षाचे सरचिटणीस त्रिलोक त्यागी यांनी चौधरी यांचे नाव सुचविले. त्यास माजी खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस मुन्शीराम पाल यांनी अनुमोदन दिले. सर्व सदस्यांनी त्यास एकमताने पाठिंबा दिला.
राष्ट्रीय लोक दलाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी पक्ष सदस्यांचा ऋणी आहे. आपण सर्वांनी आजोबा चौधरी चरण सिंह आणि वडील अजित सिंह यांच्या मार्गावर वाटचाल करायला हवी असे आवाहन जयंत चौधरी यांनी यावेळी केले.