कौशल किशोर शहीद झाल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबाला अनेक आश्वासने दिली होती.आतापर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची अनेक आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. Jayant Chaudhary met the families of Pulwama martyrs and said – If the demands are not accepted in seven days, then agitation!
विशेष प्रतिनिधी
आग्रा : राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मंगळवारी आग्रा येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कौशल किशोर रावत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यावेळी चौधरी म्हणाले की, शहिदराच्या पत्नीला सरकारकडून अवहेलना सहन करावी लागली, हे खूप लज्जास्पद आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना जमीन देण्यात यावी. इतरही काही मागण्या आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्याही लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत.जर सात दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास आरएलडी कामगार आंदोलन करतील, असे जयंत चौधरी म्हणाले. भाजप राष्ट्रवादी मुद्द्यांवर मते घेतो पण शहीदांच्या कुटुंबीयांची काळजी घेत नाही.
शहीद पत्नीचा सरकारवर आरोप :-
शहीद कौशल किशोर रावत यांची पत्नी ममता रावत यांना रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले नाही .याउलट पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात ठेवले. अद्याप त्यांना
जमीन वाटप झालेली नाही. तसेच मोफत वीज जोडणी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मिळालेला नाही.
फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू -काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये आग्राचे सीआरपीएफ जवान कौशल किशोर रावत यांच्यासह राज्यातील 12 आणि 40 जवान शहीद झाले. कौशल किशोर शहीद झाल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबाला अनेक आश्वासने दिली होती.
आतापर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची अनेक आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. यासंदर्भात कुटुंबही धरणेवर बसले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ दिनेश शर्मा यांनी त्यांच्याशी फोनवर बोलून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत फक्त शाळेचे नाव हुतात्म्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
Jayant Chaudhary met the families of Pulwama martyrs and said – If the demands are not accepted in seven days, then agitation!
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन
- काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !
- लहराए तिरंगा प्यारा; अभाविप देशभरातील १.२५ लाखांहून अधिक स्थानांवर तिरंगा फडकविणार
- NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा