• Download App
    जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ, अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश |Jaya Pradas trouble increased ordered to arrest her and produce her in court

    जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ, अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश

    सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतरही सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचल्या नव्हत्या


    विशेष प्रतिनिधी

    रामपूर : बॉलिवूड अभिनेत्री आणि नंतर राजकारणात आलेल्या जया प्रदा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. रामपूर खासदार/आमदार न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना जया प्रदा यांना अटक करून २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.Jaya Pradas trouble increased ordered to arrest her and produce her in court



    न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना विशेष पथक तयार करून जया प्रदा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी सांगितले की, माजी खासदार जया प्रदा यांच्याविरुद्ध सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतरही त्या सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचल्या नव्हत्या. जया प्रदा आचारसंहिता भंगाच्या दोन प्रकरणांत ‘फरार’ आहेत.

    काय आहे संपूर्ण प्रकरण –

    वास्तविक, 2019 मध्ये जयाप्रदा यांनी भाजपच्या तिकिटावर रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीदरम्यानच त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणे रामपूरच्या खासदार/आमदार न्यायालयात सुरू आहेत.

    जया प्रदा सलग अनेक सुनावणीत हजर राहिल्या नाहीत. त्यानंतरच त्यांच्याविरुद्ध एक एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. असे असतानाही त्या न्यायालयात पोहोचल्या नाहीत, त्यामुळे आता त्यांना अटक करून हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

    Jaya Pradas trouble increased ordered to arrest her and produce her in court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार