• Download App
    JAWED HABIB CASE : जावेद हबीबचा किळसवाणा प्रकार - राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस -11 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश|JAWED HABIB CASE: Disgusting type of Javed Habib - Notice of National Commission for Women - Order to appear on 11th January

    JAWED HABIB CASE : जावेद हबीबचा किळसवाणा प्रकार – राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस -११ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली आहेत.JAWED HABIB CASE: Disgusting type of Javed Habib – Notice of National Commission for Women – Order to appear on 11th January

    केस कापताना महिलेच्या डोक्यात थुंकणाऱ्या जावेद हबीबने आता एक व्हिडिओ जारी करून जाहीर माफी मागितली आहे. यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे.यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे.



    हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.पीडितेने मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हा व्हिडिओ ६ जानेवारी रोजी समोर आला, त्यानंतर तो व्हायरल झाला.

    पूजा गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची बागपत जिल्ह्यातील बरौत शहरातील असून ब्युटी पार्लर चालवते. याप्रकरणी पूजाने जावेद हबीबविरुद्ध मुझफ्फरनगरमधील मन्सूरपूर पोलिस ठाण्यात ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. हबीबविरुद्ध आयपीसी कलम ३५५, ५०४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरच त्याच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शने केली.

    JAWED HABIB CASE: Disgusting type of Javed Habib – Notice of National Commission for Women – Order to appear on 11th January

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!