• Download App
    Javed Akhtar "मी आणि शबाना फुटपाथवर झोपतो का?" पाकिस्तानच्या बुशरा अन्सारीवर जावेद अख्तर यांचा उपरोधिक पलटवार

    “मी आणि शबाना फुटपाथवर झोपतो का?” पाकिस्तानच्या बुशरा अन्सारीवर जावेद अख्तर यांचा उपरोधिक पलटवार

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानची ज्येष्ठ अभिनेत्री बुशरा अन्सारी हिला सडेतोड उत्तर दिले आहे . अत्यंत उपरोधिक भाषेत ते मांडले, “हो, मी आणि शबाना आजकाल फुटपाथवर झोपतो!”

    बुशरा अन्सारी यांनी एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर टीका करत म्हटलं होतं की, “तुम्ही नसीरुद्दीन शहा यांच्यासारखे गप्प का बसत नाही? मुंबईत तुम्हाला घर देखील भाड्याने मिळत नाही.” या विधानाचा समाचार घेत जावेद अख्तर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “माझ्याकडे २५ अडचणी असतील, पण तिच्याशी तुलना करताना मी सर्वप्रथम ‘भारतीय’ आहे.”

    ते म्हणाले, “हो, २५ वर्षांपूर्वी शबानाने मुंबईत एक फ्लॅट खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मुस्लिम आहे म्हणून नाकारण्यात आलं. हे लोक कोण होते? त्यांचे पूर्वज सिंधहून भारतात फाळणीवेळी निर्वासित म्हणून आलेले. त्यांच्या जखमा खोल होत्या आणि त्यांनी ती कटुता आमच्यावर काढली. पण याला जबाबदार कोण आहे?”



    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बैसरण माळरानावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले होते. या घटनेनंतर ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव’ मध्ये भाषण करताना जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकत कठोर कारवाईची मागणी केली होती.फक्त सीमारेषेवर फटाके वाजवणं पुरेसं नाही. आता काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. पाकिस्तानचा आर्मी चीफ जसं बिनधास्त वकृत्व करतो, तसं पुन्हा करण्याची हिंमत उरू नये, असे ते म्हणाले होते.

    यापूर्वीही जावेद अख्तर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातलं स्वर्ग’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात स्पष्टपणे सांगितलं होतं, “एक गट मला ‘काफिर’ म्हणतो, म्हणतो की मी नरकात जाईन. दुसरा गट म्हणतो मी ‘जिहादी’ आहे आणि मला पाकिस्तानात जावं लागेल. जर निवड फक्त ‘पाकिस्तान’ आणि ‘नरक’ यामधली असेल, तर मी नरकात जाणं पसंत करीन.”

    Javed Akhtar’s sarcastic retort to Pakistan’s Bushra Ansari

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gita Gopinath : ‘भारताला टॅरिफपेक्षा प्रदूषणाचा जास्त धोका; हार्वर्ड प्रोफेसर गीता गोपीनाथ म्हणाल्या- दरवर्षी 17 लाख लोक मरत आहेत, तरीही लक्ष नाही

    Supreme Court : SIR वर सुनावणी, सुप्रीम कोर्टाने म्हटले- प्रक्रिया पारदर्शक असावी; निवडणूक आयोग मनमानी करू शकत नाही

    Doda Army Accident : जम्मूत सैन्याची गाडी 400 फूट खोल दरीत कोसळली; 10 जवानांचा मृत्यू, 21 जण प्रवास करत होते