• Download App
    कोझिकोडच्या जस्ना सलीमची अनोखी कृष्णभक्ती; साकारली 500 पेंटिंग्स!! । Jasna Salim of Kozhikode's unique devotion to Krishna; Sakarli 500 paintings !!

    कोझिकोडच्या जस्ना सलीमची अनोखी कृष्णभक्ती; साकारली 500 पेंटिंग्स!!

    वृत्तसंस्था

    कोझिकोड : श्रीकृष्णाच्या बाललीला धर्म, जात, पंथ, लिंग वय यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना आकर्षित करतात. असेच एक आकर्षण केरळ मधीलकोझिकोडच्या जस्ना सलामीला वाटले आणि तिने श्रीकृष्णाची 500 पेंटिंग्स साकारली आहेत. Jasna Salim of Kozhikode’s unique devotion to Krishna; Sakarli 500 paintings !!

    यामध्ये जस्ना सलीम हिचा धर्म या कलेच्या आड आला नाही. आत्तापर्यंत तिने श्रीकृष्णाची विविध रूपे साकारलेली अनेक पेंटिंग्ज अनेकांना भेट दिली आहेत. अनेकांनी तिच्याकडून ती विकत घेतली आहेत, अशी माहिती तिने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.



    गेल्याच आठवड्यात ऊलयनाडच्या प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात तिला जाण्याची संधी मिळाली. त्या मंदिरात जस्ना सलीम हिने साकारलेल्या पेंटिंगचे अनावरण करण्यात आले. आयुष्यात प्रथमच तिने एका मंदिरात प्रवेश केला होता. आणि प्रथमच तिने भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाहिली. त्याआधी तिने श्रीकृष्णाची मूर्ती पाहिलेली नव्हती. बाळकृष्णाची छबी माझ्या अंतर्मनात उमटली आहे आणि त्यामुळे मी पेंटिंग्स साकारू शकते, असे असे भावपूर्ण उद्गार जस्ना सलीम काढले आहेत.

    Jasna Salim of Kozhikode’s unique devotion to Krishna; Sakarli 500 paintings !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार