विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा समाजाच्या विरोधात विरोधी पक्षनेते विजयवडेट्टीवार यांनी बोलू नये, अन्यथा विधानसभेलावडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्व जागा पाडून टाकू,अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी नवनिर्वाचितखासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासमोरच काँग्रेसनेत्यांना इशारा दिला. त्यानंतर खासदार डॉ.काळे यांनीजरांगे पाटलासंमोरच काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठनेत्यांना फोन करून मराठा आंदोलनाविरोधात भाष्यकरणे योग्य नसल्याचे सांगितले. सोमवारी जरांगेपाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. शरीरातीलपाणी कमी होत असल्याने त्यांची प्रकृती आता खालावतचालली असून उपचार घेण्यास जरांगे पाटलांनी ठामनकार दिला आहे.Jarange Patal’s warning, Vadettivars should not speak against society, otherwise they will demolish Congress seats!!
आजपर्यंत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित ५खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्याप्रकृतीची चौकशी केली. सोमवारी जालन्याचे खासदारडॉ. कल्याण काळे यांनी आंतरवालीत येऊन जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली. ते बोलत राहिले तरआम्ही वडेट्टीवार यांनाही पाडू, असा इशारा जरांगेपाटलांनी दिला. आम्ही मराठवाड्यातील कुणीच असे बोलत नाहीत, परंतू विदर्भातील काही जण आणि ओबीसींचे काही नेते यासंदर्भात बोलत आहेत. असेहोऊ नये अशी अपेक्षा डॉ. काळे यांनी व्यक्त केली. आमदार राजेश टोपे यांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली.
मराठा समाजाच्या या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील. जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार आहे. निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शंभर टक्के फायदा झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या विरोधात बोलले असतील तर ते चुकीचे आहे. मात्र माझे वाडेट्टीवार यांच्याशी फोनवर बोलणे झाले असता मी मराठा समाज अथवा आंदोलक जरांगे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य केले नसल्याचा खुलासा त्यांनी केला, असे डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.
Jarange Patal’s warning, Vadettivars should not speak against society, otherwise they will demolish Congress seats!!
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने कर हस्तांतरणापोटी राज्यांना जारी केला 1,39,750 कोटी रुपयांचा हप्ता
- Modi Cabinet 2024 List: नड्डा आरोग्य मंत्री, निर्मला अर्थमंत्री, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झाले… पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
- Modi 3.0 : मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यापेक्षा खातेवाटपात मोठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी!!
- टी20 विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवावर दिल्ली पोलिसांची मजेदार पोस्ट