• Download App
    मुंबईची कोंडी करण्याचा जरांगे पाटलांचा इरादा; त्यासाठी रोहित पवारांचा सर्व रसद पुरवठा!! Jarange Patal's intention to make trouble in Mumbai

    मुंबईची कोंडी करण्याचा जरांगे पाटलांचा इरादा; त्यासाठी रोहित पवारांचा सर्व रसद पुरवठा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लोणावळ्यात भेट घेऊनही मनोज जरांगे पाटलांनी मुंबईची कोंडी करण्याचा इशारा दिला आहे. त्यांना सर्व प्रकारची रसद पुरविण्याचा आमदार रोहित पवारांचा इरादा दिसून येत आहे. Jarange Patal’s intention to make trouble in Mumbai

    मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत येऊन आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा हट्ट धरला. मात्र पोलिसांनी आझाद मैदानाची मर्यादा लक्षात आणून देऊन त्यांना नोटीस पाठवली. आझाद मैदानात 5 ते 7 हजार लोकच आंदोलन करू शकतात. त्यापेक्षा त्या मैदानाची जास्त क्षमताच नाही, असे पोलिसांनी जरांगे पाटलांच्या लक्षात आणून दिले. परंतु जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरच आंदोलनाचा हट्ट धरला. त्यामुळे रोहित पवार मुंबई पोलीस आयुक्तांकडे शिष्टाईसाठी गेल्याची बातमी आली. त्यामुळे अर्थातच जरांगे पाटलांच्या मुंबईतल्या सगळ्या व्यवस्थेमागे नेमके कोण आहे, या निमित्ताने समोर आले.

    जरांगे पाटलांचा हा हट्ट पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातूनच जरांगे पाटलांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली सरकार मुळातच मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक आहे समितीचा अहवाल येताच विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला टिकणारेच आरक्षण दिले जाईल सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्हिटीशन देखील स्वीकारल्याने मराठा आरक्षणाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे अशा स्थितीत मुंबईत येऊन आंदोलन करण्याची भूमिका जरांगे पाटलांनी घेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले, पण जरांगे पाटलांनी मात्र ते आवाहन फेटाळले. उलट मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनीच आपले भेटीला यावे, असे आवाहन केले. यातूनच त्यांनी मुंबईची कोंडी करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला.



    आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, असा ठाम पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? अशी चर्चा असतानाच त्यांनी आझाद मैदानात व्यासपीठ तयार असल्याचे सांगत त्याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातच आंदोलन करणार असल्याचा हट्ट बोलून दाखवला.

    जनतेला त्रास नको, ते काम करत आहेत. मात्र आरक्षणावर मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही तोडगा काढण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

    सगसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का?

    मालक आल्यास आम्ही चर्चा करु, पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार? सगसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का? असे सांगत त्यांनी मागण्यांवर सरकारकडून निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आम्हाला परवानगी नाकारलेली नाही. कोर्टाची नोटीस आहे म्हणून सही केली. मात्र, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दगाफटका होऊ नये सावध राहिलेलं बरं. त्यामुळे कोणी उपद्रव केल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलं असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त मालकांनी यावं एवढंच म्हणणं असल्याचे त्यांनी सांगितले.

    मनोज जरांगे यांना नोटीस 

    मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी रोहित पवारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे जरांगे पाटलांची मागणी मान्य करण्याचा आग्रह धरला.

    आझाद मैदानात नारळ फुटला

    एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या 26 जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती.आम्ही स्टेज बांधण्याचं काम सुरु केलं आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करु, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

    Jarange Patal’s intention to make trouble in Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य