प्रतिनिधी
पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक होऊन मुंबईच्या दिशेला निघाले असताना त्यांच्या सरसकट कुणबी सर्टिफिकेटच्या मागणीला उपराकार लक्ष्मण माने यांनी ठाम विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील मनुवादी माणूस आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देणे हे आपल्याच पायावर मोठा धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, असे शरसंधान लक्ष्मण माने यांनी साधले आहे. Jarange Manuwadi, Udayanaraje – Will you give Kunbi certificate to the clans of Sardars?
लक्ष्मण माने यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. माने म्हणाले, पूर्वी जेव्हा कुणबी समाजाला सवलती मिळत होत्या तेव्हा मराठा समाज आम्ही 96 कुळी असल्याचे सांगत बाजूला राहिला. तेव्हा जर मराठा समाज कुणबी म्हणून समोर आला असता तर आता ओबीसींना जे 27 % आरक्षण मिळते, त्यापेक्षा जास्त आरक्षण मिळाले असते. पण आत्ता आहे त्या 27 % ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे मोठा धोंडा बोकांडी मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातले आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वाढवून द्यावे, अशी आमची भूमिका आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन एवढी मोठी संख्या जर ओबीसी आरक्षणात आली, तर संबंध महाराष्ट्रच आरक्षणामध्ये आल्यासारखा होईल. त्यातून मग ब्राह्मण समाजाला तरी का बाहेर ठेवायचे??, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. मग छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे आणि सरदारांची घराणी यांना देखील कुणबीचे सर्टिफिकेट देणार का?? असा सवालही लक्ष्मण माने यांनी केला.
आरक्षण घेणाऱ्या खालच्या जातीच्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागते असे जरांगे म्हणत असतील, तर मग ते आरक्षणाची मागणी करून खालच्या जातीच्या लोकांसोबत का येत आहेत?? माणूस एकतर घटनावादी असू शकतो किंवा मनुवादी असू शकतो. जरांगे पाटील हे मनुवादी आहेत. त्यांच्या आंदोलनामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे कुठलेच फोटो दिसत नाहीत, याकडे माने यांनी लक्ष वेधले.
Jarange Manuwadi, Udayanaraje – Will you give Kunbi certificate to the clans of Sardars?
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी अनुभवला अयोध्येतला अनुपम्य सोहळा, वाचा त्यांच्याच शब्दांत!!
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
- शिवराज्याभिषेकच्या ३५० व्या महोत्सवानिमित्त कर्तव्य पथावर झळकणार
- भीषण दुर्घटना! 65 युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियन लष्करी विमान कोसळले