• Download App
    internet speed जपानी संशोधकांची कमाल, इंटरनेट स्पीडच्या 1.02 पेटाबाईट्स पर्यंत वर्ल्ड रेकॉर्डची धाव!!

    जपानी संशोधकांची कमाल, इंटरनेट स्पीडच्या 1.02 पेटाबाईट्स पर्यंत वर्ल्ड रेकॉर्डची धाव!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जपानी संशोधकांची कमाल इंटरनेट स्पीडच्या 1.02 पेटाबाईट्स पर्यंत वर्ल्ड रेकॉर्डची धाव!!, ही कमाल जपानी संशोधकांनी करून दाखविली.

    जपानी संशोधकांनी साध्य केलेला इंटरनेट स्पीड अमेरिकेतल्या ऍव्हरेज इंटरनेट स्पीडपेक्षा 3.5 मिलियनने अधिक आहे, तर भारतातल्या इंटरनेट स्पीडपेक्षा तब्बल 16 मिलियनने अधिक आहे. भारतातला सर्वसाधारण इंटरनेट स्पीड 63.55 mbps एवढाच आहे. जपानी संशोधकांनी साध्य केलेल्या इंटरनेट स्पीड मुळे डिजिटल तंत्रज्ञानाची भाषा क्रांतिकारकरीत्या बदलल्याचे समोर आले आहे. संपूर्ण जगामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असे संशोधकांनी नमूद केले आहे‌.



    अर्थात जपानी संशोधकांनी साध्य केलेल्या इंटरनेट स्पीड हा लॅब मधला स्पीड आहे. जपान मधला तो सर्वसाधारण इंटरनेट स्पीड नाही. जपानमधल्या काही ठिकाणी भारतापेक्षा कमी इंटरनेट स्पीड निखिल आढळलाय. शिवाय भारतातल्या तुलनेत जपान आणि अमेरिकेतले इंटरनेट महाग देखील आहे. भारतातला इंटरनेट स्पीड आणि भारतातला इंटरनेट रेट याची तुलना करता भारत सर्वसाधारण इंटरनेट मध्ये टप्प्याटप्प्याने आघाडीवर येताना दिसतो आहे.

    अर्थात जपानी संशोधकांनी लॅब मध्ये साध्य केलेला 1.02 पेटाबाईट्स पर सेकंड ही इंटरनेट जगातली हनुमान उडी आहे. त्याचे पडसाद संपूर्ण जगावर झाल्याशिवाय राहणार नाहीत, याविषयी शंका नाही.

    Japanese researchers set world record for internet speed reaching 1.02 petabytes!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये NDAची जागावाटपाची घोषणा; भाजप-101, जेडीयू- 101, एलजेपीआर- 29, आरएलएम आणि एचएएमला प्रत्येकी 6 जागा

    Gaza Ceasefire: उत्तर गाझात परतत आहेत हजारो पॅलेस्टिनी; शाळा, रुग्णालये आणि घरे उद्ध्वस्त; देखरेखीसाठी ट्रम्प 200 सैनिक पाठवणार

    Pune Municipal : 1 जुलैनंतर नावनोंदणी केलेल्या मतदारांना यंदा मतदानाचा अधिकार नाही; मनपा निवडणुकीत राज्य आयोगाची मतदारयादीच ग्राह्य