वृत्तसंस्था
टोकियो : अग्नेय आशियातील सहा देशांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असून या देशांमध्ये असलेल्या जपानी नागरिकांनी सावध रहावे, असा इशारा जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. इंडोनेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि म्यानमार या देशांमध्ये हल्ला होण्याची शक्यता असल्याचे जपानने म्हटले आहे. Japan gave threat alert to 6 nations
या सहा देशांमध्ये आत्मघाती हल्ले होण्याचा धोका आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या जपानी नागरिकांनी आगामी काही काळ धार्मिक स्थळांपासून आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर रहावे, असे जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.
जपानच्या या इशाऱ्यानंतर संबंधित सहा देशांनी मात्र आश्चेर्य व्यक्त केले आहे. अशा प्रकारचा हल्ला होण्याची कोणतीही गोपनीय माहिती सरकारला मिळाली नसून जपान सरकारनेही माहिती दिलेली नाही, असे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
फिलीपीन्सनेही हल्ल्याची शक्यता फेटाळून लावतानाच त्यांच्या देशातील जपानी नागरिकांनाही सावधानतेचा इशारा मिळाल्याचा इन्कार केला आहे. जपाननेही याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे, मात्र संबंधित सहा देशांमधील त्यांच्या दूतावासांमध्ये त्यांनी संभाव्य हल्ल्याबाबत सूचना पाठविल्या आहेत.
Japan gave threat alert to 6 nations
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शरिया विद्यापीठ’: अफगाण विद्यार्थ्यांनी इस्लामिक कायद्यानुसार अभ्यासावर केले प्रश्न उपस्थित , तालिबानने दिली ‘ही’ ऑफर
- महाराष्ट्र: ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या’ जौनपूर पॅटर्न ‘विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला
- लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल, १.७९ कोटी जणांना लशीचा दुसरा डोस
- एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा येत्या ४ ते ६ डिसेंबरला होणार