• Download App
    नासा संस्थेचा 'इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम' (IASP) पूर्ण करणारी एकमेव भारतीय ठरली ; जान्हवी दानगेटी | Janhvi Dangeti : she has became the only Indian to complete NASA's International Air and Space Program (IASP)

    नासा संस्थेचा ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम’ (IASP) पूर्ण करणारी एकमेव भारतीय ठरली ; जान्हवी दानगेटी

    विशेष प्रतिनिधी

    अल्बामा : आंध्र प्रदेशमधील जान्हवी दानगेटी या तरूण मुलीने नासाचा ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम’ (IASP) कम्पलिट केला आहे. हा प्रोग्राम यशस्वीरीत्या पूर्ण केलेली ती भारताची पहिली विद्यार्थी ठरली आहे. जगातील एकूण 20 विद्यार्थ्यांची या प्रोग्रामसाठी निवड झाली होती. यामध्ये जान्हवी एक होती.

    Janhvi Dangeti : she has became the only Indian to complete NASA’s International Air and Space Program (IASP)

    फ्लाईट ओरिएन्टेशन, तंत्रज्ञान विकास, सिस्टीम रिसर्च तसेच स्पेस तंत्रज्ञान रिसर्च यामध्ये ही संस्था काम करते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुन्य गुरुत्वाकर्षणामध्ये देखील काम करण्याची संधी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे पाण्याखालून होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि विमान कसे चालवायचे याचे देखील प्रशिक्षण देण्यात आले होते. अशा वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टींबाबत या विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.

    या प्रशिक्षणांतर्गत जगातील एकूण 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांची एक टीम बनवण्यात आली होती. या टीमचे नाव टीम केनेडी असे देण्यात आले होते. तर या टीमची जान्हवी मिशन डिरेक्टर देखील होते.


    Anil Menon NASA: आधी स्पेस स्टेशन-चंद्र-तेथून मंगळावर जाणार; नासाकडून भारतीय वंशाचे अनिल मेमन यांची निवड


    विशाखापट्टणममधील पालाकुल्लू येथील राहणारी जान्हवीला लहानपणापासूनच अंतराळ, अंतरिक्ष याबद्दलचे वेड होते. आपल्या आजीने सांगितलेल्या गोष्टींवरून तिने अवकाशाविषयी अनेक कल्पना मनात बांधलेल्या होत्या. यातूनच पुढे तिला यामध्ये अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि तिने या गोष्टींचा प्रचंड अभ्यास केला.

    मोठी स्वप्न घेऊन लहानाची मोठी झालेली ही मुलगी एक स्टार्टअप देखील चालवते. ‘स्पेस मॅजिक’ या कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट ती आहे. या कंपनीमार्फत ज्या मुलांना अॅस्ट्रोनॉट होण्याची इच्छा आहे, त्यांना ट्रेनिंग दिले जाते. त्याचप्रमाणे ती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ अस्पायरिंग अॅस्ट्रोनॉटस, स्पेस टेक्नॉलॉजी अॅन्ड एरॉनॉटिकल रॉकेटरी या संस्थांची सदस्यदेखील आहे. जान्हवीचे मंगळावर जाण्याचे स्वप्न आहे आणि यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे.

    Janhvi Dangeti : she has became the only Indian to complete NASA’s International Air and Space Program (IASP)

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची