विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – जम्मू – काश्मीरवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या महत्त्वपूर्ण सर्वपक्षीय बैठक बोलवली असून तीत भाग घेण्यासाठी राज्यातील सर्व पक्षांचे नेते दिल्लीमध्ये डेरेदाखल झाले आहेत. या बैठकीतून राज्याच्या राजकीय भवितव्याला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यात निवडणूका जाहीर करण्यापासून ते राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा एकदा बहाल करण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश असू शकतो. JammuandKashmir has been put on alert for the next 48 hours ahead of PM Narendra Modi’s all-party meet
जम्मू-काश्मीरमधील राजकीय घराण्यांच्या गुपकार आघाडीतील सर्व पक्षांनी आणि काँग्रेसनेही बैठकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात ४८ तासांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. २४ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीतील चर्चा काश्मीरी जनतेच्या हिताची असेल तर स्वीकारली जाईल, अन्य आम्ही प्रस्ताव फेटाळून लावू, अशी पीडीपीची भूमिका आधीच जाहीर केली आहे. जम्मू काश्मीर अपनी पार्टीचे प्रमुख सय्यद अल्ताफ बुखारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना आणि पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता हे जम्मूहून दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती या देखील दिल्लीत पोहोचल्या आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हे कालच शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचच्या बैठकीत सामील झाले होते. तेव्हापासून ते दिल्लीतच आहेत. ते देखील सर्वपक्षीय बैठकीत सामील होणार आहेत.
JammuandKashmir has been put on alert for the next 48 hours ahead of PM Narendra Modi’s all-party meet
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही, मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल ; अब्दुल्ला यांनी स्वीकारले पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण
- तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही, मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल ; अब्दुल्ला यांनी स्वीकारले पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण
- विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षांपासून माझ्यापासून अलिप्त
- कोल्हापूरात मराठा आंदोलन; मुंबईत दोनच दिवसांचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन; दिल्लीत पवारांच्या घरी मोदींना पर्याय देण्यासाठी बैठक